Breaking News

मुलीचा खून करून आईचा आत्महत्येचा बनाव

पुणे, 07 -  स्वतःच्या पावणेदोन वर्षे वयाच्या मुलीचा खून करून आत्महत्येचा बनाव केल्याचा प्रकार उघडकीस  आला आहे. अक्षिता संजय सावळे (वय 1 वर्षे 9 महिने) असे मृत मूलीचे नाव आहे. याप्रकरणी मुलीची आई अनिता (वय- 23) हिच्याविरोधात पती संजय नारायण सावळे (वय-30, सर्व रा. शुभांगम सोसायटी, तिरूपतीनगर, वारजे नाका) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी अनिता हि सध्या वारजे येथून पळून गेली असून येरवड्यातील एका खासगी रूग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
संजय हे एका खासगी कंपनीमध्ये विभागीय व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. गुरूवारी सकाळी कंपनीत बैठक असल्यामुळे ते बैठकीला गेले. सायंकाळी 7 वाजता संजय यांच्या भावाच्या पत्नीने पाळण्यात अक्षिता एकटीच असून कोणतीच हालचाल करत नसल्याचे कळविले. संजय घरी आल्यानंतर त्यांना पत्नीने लिहीलेली सापडली. ज्यामध्येस मला जगण्याची इच्छा नसून माझ्यामागे मूलीची फरफट होऊ नये यासाठी सोबत नेत आहे, असा आशय लिहीला होता. घऱातील पंख्याला साडी बांधून घेतली होती. अक्षिता हिचा खून नाक-तोंड दाबल्यामुळे किंवा विष पाजून झाला असल्याचे फिर्यादी संजय यांचे म्हणने आहे. अनिता हिच्यावरील उपचार पूर्ण होताच तिला अटक करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक अनुजा देशमाने यांनी कळविले आहे.