लातूरच्या जिल्हा रूग्णालयात रूग्णालाच मारहाण - नागरिकांत संताप जबरदस्तीने डिस्चार्ज घटनात्मक अधिकारावरच हल्ला
लातूर/प्रतिनिधी । 08 - केस पेपर संदर्भात दाखविलेला बेजबाबदारपणा अंगावर येऊ नये म्हणून रूग्णाला जबरदस्तीने डिस्चार्ज देणार्या वैद्यकीय अधिकार्याने रूग्णासह नातेवाईकाला मारहाण केल्याप्रकरणी कुंभार समाजात तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या संदर्बात तपशीलवार वृतांत असा की, डोक्यात मुंग्या येत असलेल्या ज्ञानेश्वर मडीकर यांना लातूरच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सुरूवातीचे उपचार केल्यानंतर सदर रूग्णाचा केसपेपर हरविल्याची बाब रूग्णालय प्रशासनाच्या लक्षात आली. प्रशासनाचा हा बेजबाबदारपणा झाकण्यासाठी सदर रूग्णाने डिस्चार्ज घ्यावा म्हणून दबाव टाकला जाऊ लागला. इतकेच नाही तर प्रशासनाने डिस्चार्ज देण्याची तयारी केली. डिस्चार्ज घेण्यास विरोध असणार्या नातेवाईकांनी वैद्यकीय अधिकार्यांना जाब विचारताच अधिकार्यांनी रूग्णासह नातेवाईकांना मारहाण केल्याची तक्रार पोलीसांत दाखल झाली आहे. या घटनेचा अखिल कुंभार समाजाकडून तिव्र निषेध केला जात आहे.
दरम्यान, जिल्हा शासकीय रूग्णालयात
उपचार घेणे हा सामान्य माणसाचा घटनात्मक अधिकार आहे. या घटनात्मक अधिकारावरच या मुजोर वैद्यकीय अधिकार्यांनी हल्ला केल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहे. या घटनेबाबत बाराबलुतेदार महासंघ व क्रांतीसूर्य ओबीसी सेवासंघाने तीव्र निषेध नोंदवला आहे, संबंधितांना अटक न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बारा बलुतेदार, अखिल भारतीय प्रजापती कुंभकार महासंघाचे व क्रांतीसूर्य ओबीसी सेवासंघाचे अशोक सोनवणे यांनी दिला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री आणि गृहराज्य मंत्री ना.राम शिंदे यांना निवेदन दिले आहे.