ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची निर्दोष सुटका
मुंबई, 23 - ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची 18 वर्ष जुन्या प्रकरणात गिरगाव सत्र न्यायालयाने निर्दोष सुटका केली. दिलीप कुमार दोषी नसल्याचा निकाल न्यायालयाने दिला. न्यायालयात झालेल्या सुनावणीला दिलीप कुमार हजर राहू शकले नाहीत.
न्यायालयाने दिलीप कुमार यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, वयाच्या 94 व्या वर्षी खटल्याच्या सुनावणीसाठी हजर रहाण्याच्या आदेशावर सोशल मिडीयामधून टीका करण्यात येत होती. 18 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणावर गिरगाव जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश बी एस खराडे यांनी सुनावणी केली. अखेर मंगळवारी झालेल्या सुनावणीत त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. दिलीप कुमार यांच्या पत्नी अभिनेत्री सायरा बानू यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली होती.