जवानांमध्ये चकमक सुरू असतांना मशिदीतून दहशतवाद्यांचे कौतूक
श्रीनगर, 23 - गेल्या तीन दिवसापासूव पंपोर येथे दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये चकमक सुरू असतांना तेथील स्थानिक मशिदीमधून मात्र, दहशतवाद्यांचे कौतूक केले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
एका वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रेस्टाबाल, द्रांगबाल, कडलाबाल आणि सेमपोरा या भागातील मशिदींच्या लाऊडस्पीकरवर जाहीरपणे जवानांवर गोळया झाडणा-या दहशतवाद्यांचे कौतुक होत होते.या स्पीकरवर ‘जागो, जागो सुबह हुई तसेच ‘स्वतंत्र काश्मीर’ आणि पाकिस्तानच्या समर्थनाच्या घोषणा या मशिदीच्या लाऊडस्पीकरवरुन देण्यात येत होत्या. पंपोरमध्ये ज्या ठिकाणी चकमक सुरु होती. तेथे चकमकीला विरोध करण्यात येत असल्याचे वृत्त आहे. शनिवारी संध्याकाळी सुरु झालेली ही चकमक सोमवारी संध्याकाळी संपली. येथील शासकीय इमारतीत लपून बसलेल्या तीन दहशतवाद्यांना लष्कराने कंठस्नान घातले पण या चकमकीत भारताचे पाच जवान शहीद झाले.