Breaking News

जेएनयूमध्ये दररोज 3000 कंडोम वापरतात : आ. अहुजा

नवी दिल्ली, 23 - जवाहरलाल नेहरु विद्यापीठ देशद्रोही लोकांचा अड्डा झाला आहे. संस्कृतीच्या नावावर येथील विद्यार्थी रात्री 8 नंतर विवस्र अवस्थेत नाचतात. दररोज 3000 कंडोम वापरतात, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे राजस्थानमधील आमदार ग्यानदेव अहुजा यांनी केले आहे. 
ग्यानदेव अहुजा म्हणाले, की जेएनयूमधील बहुतेक विद्यार्थी दररोज गर्भनिरोधक इंजेक्शन घेतात. तुमच्या मुलींसोबत आणि बहिणींसोबत चुकीच्या गोष्टी करतात. भारतीय संसदेवर दहशतवादी हल्ला केल्या प्रकरणी अफजल गुरुला फाशी झाली आहे. त्याचा गौरव या विद्यापीठात केला जातो. येथील विद्यार्थी बंडखोर आहेत.
अहुजा म्हणाले, की तुम्हाला हे जाणून आश्‍चर्य वाटेल, की दररोज 3000 बिअर बॉटल आणि कॅन विद्यापीठात वापरल्या जातात. यातील दारु कोण घेत असेल याचा अंदाज तुम्हीच लावा... याच कॅम्पसमध्ये दररोज 10,000 पेक्षा जास्त सिगारेटची थोटके आणि 4000 हून अधिक वापरलेल्या बिड्या सापडतात. एवढेच नव्हे तर दररोज 50,000 बोन्स आढळतात. त्यातील काही लहान तर काही मोठ्या आकाराचे असतात. येथील विद्यार्थी देशद्रोही आहेत.