Breaking News

पालकमंत्र्याच्या कायार्र्लयासमोर पुन्हा विडी कामगारांचे धरणे

 अहमदनगर । प्रतिनिधी । 23 -  विडी बंडलवरील 85 टक्के धोकाचित्र छापण्याचा केंद्र शासनाने घेतलेला निर्णय त्वरीत रद्द करावा व 15 ते 24 फेब्रुवारी पर्यंत मालकांनी बंद केलेले विडी कारखाने त्वरीत सुरु करण्याच्या मागणीसाठी विडी कामगारांनी सोमवार दि.22 फेब्रुवारी रोजी पुन्हा पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रेमदान चौकातील संपर्क कार्यालया समोर धरणे आंदोलने केले. आंदोलनात मोठ्या संख्येने विडी कामगार महिलांनी सहभागी होऊन जोरदार निदर्शने केली.
 राज्यातील 2 लाख विडी कामगार कामाअभावी बेकार झाले आहे. 10 दिवसात विडी कामगारांचे 20 कोटी रुपयाची मजुरी बुडाली आहे. यामुळे विडी कामगारांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. सरकारच्या विडी कामगार विरोधी धोरणामुळे विडी कामगार संकटात सापडला आहे. केंद्र सरकारने 85 टक्के धोका चित्र छापण्याचे घेतलेल्या चुकीच्या निर्णयाने देशातील 75 लाख विडी कामगारांचे कुटुंब रस्त्यावर येणार असल्याचे राज्य विडी कामगार फेडरेशनचे सचिव कॉ.शंकर न्यालपेल्ली यांनी सांगितले.गेल्या 8 दिवसापासून राज्यात विविध ठिकाणी विडी कामगारांचे या प्रश्‍नावर आंदोलन चालू आहे. राज्य सरकार विडी कामगारांच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करत असल्याने विडी कामगारांमध्ये असंतोष पसरला असल्याचे फेडरेशनचे अध्यक्ष कॉ.कारभारी उगले यांनी सांगितले.    तेलंगणा सरकार प्रमाणे महाराष्ट्र सरकारने विडी कामगारांच्या प्रश्‍नावर कामगारमंत्री यांना केंद्रसरकार दरबारी चर्चा करण्यास पाठवून 85 टक्के धोकाचित्र छापण्यासाठी फेरविचार करण्याची मागणी करण्यात आली आहे. आंदोलनात कॉ.शंकर न्यालपेल्ली, कॉ.कारभारी उगले, कॉ.अ‍ॅड.सुधीर टोकेकर, सायन्ना यनगंदुल, नारायण आडणे, शंकरराव मंगलारप, बुचम्मा श्रीमल, कॉ.रामचंद्र पाटील, प्रदीप नागापूरकर, कृष्णाबाई झुंजूर, निवृत्ती दातीर, बापू कानवडे, शांताराम वाळूंज आदी सहभागी झाले होते.