Breaking News

मुंबईत भिंत कोसळून दोघांचा मृत्यू

मुंबई : 25 -  मुंबईतील डॉकयार्ड रेल्वे स्टेशनवर भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी संध्याकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. गणेश जांबरे (वय 45 वर्ष) आणि नसरीन इब्राहिम (वय 30 वर्ष) अशी मृतांची नावं आहेत.  

रेल्वे स्टेशवर काही काम सुरु होतं. त्यावेळी गणेश जबरे आणि नसरीन नावाची महिला तिथून जात होती. मात्र त्याचवेळी रेल्वेच्या भिंतीचा काही भाग कोसळला आणि दोघेही त्याखाली अडकले. ढिगाऱ्याखालून काढल्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.पोलिसांनी या प्रकरणी रेल्वे कंत्राटदाराविरोधात भारतीय दंडविधान कलम 304 अ/34 अंतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. या घटनेला रेल्वेचे अधिकारी जबाबदार असल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.