सामंतशाहीचा नवा अवतार
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील सध्याचे वातावरण आणि हैदराबाद विद्यापीठाचा संशोधक विद्यार्थी रोहित वेमुलाच्या मृत्यूनंतर निर्माण झालेली राजकीय परिस्थिती गंभीर आहे. आधी त्याला दलित मग ओबीसी आणि आता दहशतवाद समर्थक ठरवणारे लोक हे सांगत नाहीत की, तो भेदभावाची दरी वाढवणार्या मनुवादाचाही विरोधक होता. त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या करून त्याला आत्महत्येचे स्वरूप दिले आहे, हा सध्या तपासाचा विषय आहे. मात्र एवढे निश्चित म्हणता येईल की, भेदभावाच्या विरोधात आवाज उठविणार्या या विद्यार्थ्याच्या मृत्यूने सामंतशाहीचा नवीन अवतार समोर आला आहे. हक्कासाठी उठणारा आवाज दडपणार्या षडयंत्राचा वास येत आहे. आत्महत्येसारखा निर्णय फक्त भित्रेच घेतात, असे म्हटले जाते. रोहित वेमुलाचा संघर्ष आणि त्याचे आंदोलन याचा पुरावा आहे की तो भित्रा नव्हता. उलट आंबेडकरवादी मिशनचा एक साहसी युवक होता. मग त्याने आत्महत्येसारखा अपमानजनक मृत्यू का स्वीकारला? याची चौकशी झाली पाहिजे. रोहितने आत्महत्येचा निर्णय एवढ्या सहजपणे घेतला नसेल, हे उघड आहे. त्याच्या आंदोलनाने मनुवाद्यांच्या छातीवर साप नाचत होता. त्यामुळे म्हणता येईल की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) द्वारा पोषित अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीवीपी) कमजोर होईल या भितीने त्याच्या साथीदारांसहित त्याला हॉस्टेलमधून निलंबित करून मानसिक त्रास दिला असेल, त्यामुळे खचून जाऊन त्यानेे 17 जानेवारी, 2016 रोजी रात्री आत्महत्या केली असेल. त्याची हत्या करून आत्महत्येचे स्वरूप दिले असेल, असेही होू शकते. या प्रकरणी मनुवादी विचाराचे लोक मीडियालाही निशान्यावर घेत आहे, ही शरमेची बाब आहे. देशभरात दररोज विद्यार्थी-विद्यार्थिनी आत्महत्या करीत आहेत, मात्र या एका विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणी मीडिया दलित आणि सवर्ण यांच्यात अंतर वाढवित असल्याचे म्हटले जात आहे. असे म्हणणार्या लोकांना विद्यापीठे आणि अन्य संस्थांतील भेदभाव बहुधा दिसत नसावा. रोहित वेमुला तर याच भेदभावा विरुद्ध आवाज उठवीत होता. त्याला दडपण्यासाठी सामंतशाहीने आपले विखारी जाळे फेकले. ही सामंतशाही हैदराबादच नाही तर अन्य अनेक विद्यापीठातही आहे. जिथे विद्यार्थ्याची जात आणि वर्ण पाहून त्याला वागविले जाते. केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री स्मृति ईरानी यांनी देशभरात बहुसंख्यक दलित समाजाचा आक्रोश पाहता म्हटले की, ’रोहित वेमुला दलित नाही तर मागासवर्गीय होता.’ त्यांच्या म्हणण्यानुसार तो मागास जातीचा असला तरी त्याच्या मृत्यूचा जल्लोष करायचा काय? की दलित आणि अतिमागास जातीच्या लोकांचा जीव हा जीव नसतो? अर्थात, ही काही नवीन बाब नाही. दलित, मागासवगाअना शेकडो वर्षांपासून जनावरांपेक्षा हीन समजले जात आले आहे. त्यांच्या हत्येचे पाप गंगास्नानाने धुता येते या मनुवादी विचार आणि सामंतशाहीने या समाजाचे हित कधी इच्छिले नाही. बहुसंख्यक दलित आणि मागास समाजाला हजारो तुकड्यात विभागून मूठभर लोक त्यांच्यावर सत्ता गाजवीत आहेत. ते आताही सुरू ठेवण्याचा विचार राष्ट्राच्या मजबूतीसाठी घातक आहे. आज जेव्हा या समाजाचे लोक पुढे जाऊ इच्छितात ते त्यांना रूचत नाही. सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सुबमण्यम स्वामी यांनी रोहित प्रकरणाचा विरोध करणार्यांना ’सत्तेच्या मागे धावणारे कुत्रे’ असे म्हणून आपल्या सामंतशाही आणि मनुवादी विचारांचा परिचय दिला आहे. लोकशाही मार्गाने विरोधी आंदोलन करणार्यांना ’कुत्रे’ म्हणणे कितपत उचित आहे, यााबाबत मंथन झाले पाहिजे. दरम्यान उशिरा का होईना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखनौमध्ये थोत्रडी भावुकता दाखवून रोहित समर्थकांच्या दुखत्या नसीवर बोट ठेवले आहे. दुसरे असे की अशाप्रकारच्या कोणत्याही प्रकरणात स्वार्थी राजकारण करण्याचे प्रयत्न योग्य नाहीत. यामुळे घटनास्थळापासून हजारों किलोमीटर दूर राहणार्या लोकांच्या भावना भड़कू शकतात. कधी कधी या भावना हिंसक रूप धारण करतात. त्यामुळे हे प्रकरण सामोपचाराने मिटवावे. त्याला राजकीय मुद्दा करता कामा नये. देशभराज दलित आणि मागासवर्गीयांचे शोषण सामंतशाही मानसिकता करीत आहे. दलित आणि मागास समाजातील लोका राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात यावेत, हे त्यांना नकोय. कारण यामुळे त्यांचे वर्चस्व संपण्याची भीती त्यांना सतावत आहे. शेकडो वर्षांपासून उपेक्षित असलेला समाज ताठ मानेने चालणे मनुवादी मानसिकतेच्या लोकांना खटकते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळात असेच घडत होते. आता थोडे स्वरूप बदलले आहे. तेव्हा लोक दूर राहू इच्छित असत आणि आज मैत्रीचा हात पुढे करून वार करीत आहेत. रोहित वेमुलाचा गुन्हादेखील तो दलित किंवा मागास असणे हा नव्हता. काही प्रकरणात असहमतिमुळे लोकशाही विरोध त्यावर भारी पडला. विरोध प्रदर्शन देशभरात रोज होतात. तालुका, तहसील आणि जिल्हा मुख्यालयापासून ते विधानसभा आणि संसद भवनापर्यंत आंदोलने करून लोक आपला आवाज उठवतात. हे प्रदर्शन कधी आमदार, मंत्री, मुख्यमंत्रीं, पंतप्रधान कार्यालय व त्यांच्या घरासमोर होते. मग याचा अर्थ त्या आंदोलकांना गाव, शहर आणि देशातून काढावे काय? रोहित आणि त्याच्या चार साथीदारांना वसतिगृहातून निलंबित करून विद्यापीठ प्रशासनाने सामंतशाही मानसिकताच दाखविली आहे. हे निलंबन सामंतशाहीचा नवीन अवतारच नाही काय? आणखी एका बाबीचा उल्लेख करणे उचित ठरेल की, सत्ता आणि प्रशासनातील लोकांच्या विचारानुरूप आवाज उठतो तेव्हा तो त्याला सहर्ष ऐकू इच्छितो. मात्र हा आवाज त्याच्या विचाराविरोधात असेल तर दडपशाहीचे धोरण अवलंबले जाते. रोहित वेमुलाही याचाच बळी ठरला. असे म्हणता येईल की, सामंतवादी दडपशाहीपुढे झुकून त्याने आत्महत्या केली, हे अजिबात चांगले केले नाही. आंबेडकर स्टूडेंट एसोसिएशनशी संबंधीत असूनही बहुधा ते आंबेडकरांना समजू शकले नाही. समजले असते तर, शोषण त्यांच्या मार्गातील अडसर ठरला नसता.