भाजप, संघाविरोधात बोलणे आता गुन्हा : केजरीवाल
नवी दिल्ली, 19 - केजरीवाल यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा मोदी सरकारला धारेवर धरले. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात बोलणे म्हणजे गुन्हा होऊ लागला आहे, अशी खोचक टीका केजरीवाल यांनी केली.
वकिलांच्या धुडगूस प्रकरणी अहवाल सादर देशात सध्या सुरू असलेल्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) वादाच्या प्रकरणावर ते बोलत होते.
तुम्ही भाजपवाले असाल तर तुम्ही खून, बलात्कार किंवा हाणामारी काहीही करा तो गुन्हा ठरणार नाही, पण तुम्ही भाजप किंवा संघाविरोधात ब्र काढलात तर तो गुन्हा ठरू लागला आहे. त्यांच्या विरोधात तुम्ही कोणतेही मत व्यक्त केले तर तो देशद्रोह ठरतो, असा जोरदार टोला केजरीवाल यांनी लगावला. पतियाळा न्यायालयाबाहेर कन्हैय्या कुमारला झालेल्या मारहाण प्रकरणावरही केजरीवाल यांनी संताप व्यक्त केला. या प्रकरणाला केजरीवालांनी दिल्लीचे पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांना दोषी ठरविले.