भारतीय मजदूर संघ नाशिकच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
नाशिक/प्रतिनिधी। 28 - भारतीय मजदूर संघाने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत त्यांच्या मागण्यांसंबधी जिल्हाधिकार्यांच्या माध्यमातून केंद्र सरकारला निवेदन दिले. या निवेदनाच्या माध्यमातून संघाच्या वतीने किमान वेतन पंधरा हजार लागू करावे, बोनस कायदा 1965 मध्ये दुरुस्ती करून बोनस सिलिंग उठवावे, ग्रॅच्युटीची र्मयादा वाढवावी, असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करावी,
कँत्राटी कामगारांना कायम करावे, किमान पेन्शन तीन हजार रुपये करावी, कामगार कायद्यात बदल करू नये आदि मागण्यांसह जमीन अधिग्रहण विधेयक मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी संघाने बुधवारी संपूर्ण देशभरात निदर्शने करण्यात आली होती. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय मजदूर संघाच्या नाशिक शाखेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी वि. गो. पेढारकर, विजय मोगल, गोविंद चिंचोरे, सुरेश चारभे, शशिकांत मोरे आदिंसह संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.