राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी
नाशिक/प्रतिनिधी। 20 - छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती आज राष्ट्रवादी भवन, मुंबई नाका येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस नानासाहेब महाले यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.
शहराध्यक्ष आ. जयवंतराव जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि, मुघलसाम्राज्याचा कालखंड हा खूप हलाखीचा होता. तेव्हा जनतेवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार केला जात होता. या सर्व यातनेतून छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेला बाहेर काढले. व स्वराज्याची स्थापना केली. महाराजांसमोर अनेक दुश्मनाचा फौजफाटा उभा राहत असे पण ते गनिमीकाव्याने या सर्वाना मात देत होते. महाराजानाचा इतिहास बघितला तर तो खूप मोठा आहे अफझलखानाचा वध, शाहिस्तेखानाची बोटे, सुरत वरची मोहीम, राज्यभिषेक, कर्नाटक मोहीम असे अनेक प्रसंग या इतिहासात आढळून येतात. पण हा सर्व इतिहास महात्मा ज्योतीराव फुले यांनी शोधून काढला. पहिली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती त्यांनी चालू केली. आज हि अनेक शिवकालीन पत्र व्यवहार असाच पडून आहे ते वाचण्यास कोणीच तयार होत नाही. महाराजांनी कधीही शेतकर्याकडून जबरदस्तीने शेतसारा वसूल केला नाही. दुष्काळ पडला असेल तर शेतकर्यांचा शेतसारा त्यांनी माफ केला आहे. शेतकर्यांनाचा नव्हे तर त्यांच्या संपूर्ण जनतेला लागणारी मदत ते मागण्यापुर्वीच देत असत म्हणूनच त्यांना जाणता राजा असे म्हणतात. आपला देश कृषी प्रधान देश आहे या दृष्टिकोनातूनच महाराजांनी शेतकर्याच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. पण सध्याच सरकार हे सर्व विसरून गेले आहे.
फक्त निवडणुकीत मत मागताना त्यांना महाराजाची आठवण आली व समाधी पुढे बसून आम्ही महाराजांच्या विचारांचे व शेतकर्यांच्याच बाजूने आहोत असे महाराष्ट्राच्या जनतेला सांगण्यात आले पण दुष्काळाच्या वेळी विदेश दौरा त्यांना महत्त्वाचा वाटला. अजूनहि शेतकर्यांचे कर्ज माफ केले नाही दुष्काळग्रस्त शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करीत आहे. तर यांचे खासदार म्हणतात कि, आत्महत्या हि तर शेतकर्यांची फॅशन आहे. असे करंटे सरकार काय कामाचे ? भारतावर परराष्ट्राचे आक्रमण हे फक्त समुद्रामार्गे होणार हे महाराजांना तेव्हाच माहित होते. म्हणूनच त्यांनी समुद्र किनार्यावर मोठ्या प्रमाणवर तटबंदी उभारली होती.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार, प्रांतिक सदस्य मुख्तार शेख, शहर कार्याध्यक्ष छबू नागरे, महिला शहराध्यक्ष सुनिता निमसे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, युवती जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, युवती शहराध्यक्ष प्रियांका शर्मा, सामाजिक न्याय विभाग नितीन चंद्रमोरे, बालम पटेल, विधानसभा अध्यक्ष संजय खैरनार, दत्ताकाका पाटील, विभाग अध्यक्ष मनोहर कोरडे, शहर पदाधिकारी रामू जाधव, महेश भामरे, शंकर मोकळ, विजय तुपलोंढे, संदीप शिंदे, सतीश आमले, अनिल परदेशी, योगेश दिवे, दीपा कमोद, चित्रा तांदळे, अल्ताफ पठाण, प्रशांत वाघ, रवींद्र गामणे, राहुल तुपे, रोहित यादव, किरण पानकर, रितेश जाधव, महेश सानप, दत्ताजी महाले, भारत गांगुर्डे, वैभव ठोंबरे, पुष्पा राठोड, रेखा काकड, रोशनी पाटील, कोमल साळवे
आदि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.