Breaking News

‘कबीर कॅफे’ने नाशिककरांची मने जिंकलीत

नाशिक/प्रतिनिधी। 20 - ‘चदेरियाँ छि छि रे छिनी’, ‘हे राम राम न रसविनी’, ‘होशियार रहना नगर मे चोर आवेगा’, ‘जागृत रहना नगर में चोर आवेगा’ या संत कबीरलिखित दोहे आणि त्यांचे महत्त्व सांगणार्‍या नीरज आर्या यांच्या ‘कबीर कॅफे’च्या फ्युजन संगीतामुळे नाशिककर मंत्रमुग्ध झाले. 
वनबंधू परिषद, नाशिक चॅप्टरतर्फे एकल अभियानासाठी नीरज आर्या यांचा ‘कबीर कॅफे’ महाकवी कालिदा कलामंदिरात झाला.  नीरज आर्मा, मुकुंद रामास्वामी, रमण अय्यर, वीरेन सोलंकी आणि ब्रिटो केसी यांनी ‘कबीर कॅफे’ तून संत कबीर यांच्या दोह्यांचे महत्त्व संगीतातून उलगडले.  संत कबीर यांचा संदेश आम्ही जनतेपर्यंत संगीताच्या माध्यमातून दोन वर्षापासून पोचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आर्या यांनी सांगितले.  आतापर्यंत कबीर कॅफे ने देश आणि जगभरात 240 हून अधिक प्रयोग सादर केले.  
मनीषा अधिकारी यांनी संत कबीर यांचा जीवनपट, त्यांचे कार्य आणि त्यांनी दिलेली शिकवण कथन केली. यावेळी अंध मुलांनी तयार केलेल्या फुलांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.  यावेळी वनबंधू परिषद, नाशिक चॅप्टरचे रामरतन करवा, नेमीचंद पोद्दार, अशोक कटारिया, हरिष बैजल, संजय लोंढे, निशिकांत आहिरे, अध्यक्ष सुनील चांडक, उपाध्यक्ष प्रकाश लढ्ढा, महाराष्ट्र बँकेचे महाप्रबंधक मोहंती, अ‍ॅड. संजय मुंदडा, शैलेश सिंघानिया, शिल्पा मेहता व वनबंधू परिषदेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.