Breaking News

आज बनमेरु महाविद्यालयात प्राणिशास्त्र उत्सवाचे आयोजन

 बुलडाणा (प्रतिनिधी) । 28 - जगप्रसिध्द खार्‍या पाण्याच्या सरोवराबद्दल आणि त्याच्या संवर्धनाबाबत आणि त्यातील जैवविविधतेबाबत ‘हितचिंतक असलेले कै.कु.दुर्गा बनमेरु विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रकाश बनमेरू आणि प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.मिलींद गायकवाड यांनी विद्यार्थ्यांमध्ये प्राण्यांबद्दल प्रेमभाव आणि त्यांच्या सुप्तगुणांना चालना देण्यासाठी आज दि. 28 फेब्रुवारी 2016 रोजी आंतर-महाविद्यालयीन भव्य प्राणीशास्त्र उत्सवाचे आयोजन केले आहे.
 या उत्सवात विद्यार्थी आपल्या जवळील असलेल्या प्राण्यांबद्दलची माहिती आढळलेल्या एखाद्या दुर्मिळ प्राण्याबद्दलची माहिती तसेच प्राणीशास्त्राशी संबंधीत बरेच काही सादर करणार आहेत. तरी सर्व महाविद्यालयाच्या प्राध्यापक तसेच प्राचार्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना यासाठी प्रोत्साहन द्यावे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उत्सवामध्य सहभागी व्हावे असे आवाहन प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.मिलींद गायकवाड आणि प्रा.मिश्रा मॅडम यांनी केले आहे.