विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन उत्साहात संपन्न
अहमदनगर । प्रतिनिधी । 28 - राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त इन्स्टीट्युट ऑफ इंजिनिअर्स अहदनगर शाखेच्या वतीने स्व.अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मिडीयम स्कुलच्या सभागृहामध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून या विज्ञान प्रदर्शनाचे उद2घाटन अ.ए.सोसायटी हायस्कुलच्या प्रमुख कार्यवाह श्रीमती छायाताई फिरोदिया यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने व दिनप्रज्वलनाने करण्यात आले. याप्रसंगी इन्स्टीट्युटचे अध्यक्ष अरविंद पारगांवकर, छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य राजकुमार देशपांडे, इन्स्टीट्युटचे मानदसचिव हरिचंद्र थिगळे व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला थिगळे यांनी प्रदर्शनाच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. या प्रदर्शनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, नेप्ती येथील विद्यार्थी विद्यार्थींनी विकसित केलेली वैज्ञानिक उपकरणे व प्रोजेक्ट तसेच एल अॅण्ड टी संचलीत अगत्स्या फौंडेशनच्या फिरत्या वैज्ञानिक प्रयोग शाळेची सुमारे 50 हून अधिक उपकरणे सादर करण्यात आली आहे. हे प्रदर्शन शनिवार दि.27 व रविवार दि.28 फेबु्रवारी पयरत सकाळी 8 ते सायंकाळी 6 पयरत इंग्लिश मेडियम स्कुलच्या सभागृहात सवारसाठी मोफत ठेवण्यात आलेली आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी इन्स्टीट्युटचे अध्यक्ष अरविंद पारगांवकर यांनी बोलताना सांगितले कि, विज्ञाना विषयी विद्यार्थींनी आपली जिज्ञासू वृत्ती वाढीस लावली पाहिजे. व आपल्या देशाचे थोर शास्त्रज्ञ सी.व्ही.रामन यांनी प्रकाशाच्या पृथ्यकरणाचा शोध 28 फेब्रुवारी 1930 रोजी लावला. या जागतिक किर्तीच्या संशोधनामुळे भारतामध्ये 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणुन साजरा केला जातो.