टँकर व छावण्या सुरु करा; काँग्रेसचा इशारा
अहमदनगर । प्रतिनिधी । 28 - नगर जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. दुष्काळामुळे शेतकरी वर्ग दुहेरी, तिहेरी आर्थिक संकाटात सापडला असून, जिल्ह्यातील पाणी प्रे गंभीर झाला आहे. नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय होवू नय म्हणून तात्काळ आवश्यकत्या त्या ठिकाणी पिण्याचे टँकर व पशुधन वाचविण्यासाठी छावण्या सुरु करण्यात याव्यात, अशा प्रकारची मागणी जिल्हा काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांनी दिला आहे. श्री. ससाणे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी जिल्हाधिकार्यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले.
निसर्गाने अवकृपा दाखविल्याने जिल्ह्यातील खरीप व रब्बी पिके शेतकर्यांच्या पदरात पडली नाहीत. विहीरींनी तळ गाठला असून, पाझर तलावे कोरडीठाक पडली आहेत. धरणांचा पाणी साठाही कमी झाला असून, फळबागा वाचविण्यासाठी शेतकर्यांना टँकरद्वारे विकत पाणी घालावे लागत आहे. पाणी व चारा टंचाईमुळे पशुधन कसे वाचावावे, हे शेतकर्यांसमोर मोठे आव्हान आहे. सर्वच बाजूंनी शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. शेतकरी
वाचला तरच देश वाचेल, ही वस्तुस्थिती आहे. दुष्काळात शेतकर्यांना मदतीचा हात देण्यासाठी सर्व शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची फी माफ करावी आणि तात्काळ टँकर व छावण्या सुरू कराव्यात, असे निवेदनात म्हटले आहे.