Breaking News

जबरी चोर्‍या करणारा गुन्हेगार जेरबंद

 पुणे (प्रतिनिधी)। 28 -  अट्टल चोरी व जबरी चोरी यांसारखे गंभीर गुन्हे असणार्‍या गुन्हेगारास देहूरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत शितळानगर स्मशानभूमीच्या जवळ अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली.
सोन्या उर्फ सुरज अरविंद जगताप, वय-25, राहणार गांधीनगर, देहुरोड असं जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये चोरीचे 2 गुन्हे, पौड पोलीस स्टेशन येथे 1 तर पुणे लोहमार्ग पोलीस स्टेशन येथे जबरी चोरीचे 2 गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. याशिवाय आरोपीकडून आणखी जास्त चोरी व जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस सहायक अंकुश माने, सहा. फौजदार दत्तात्रय गिरीमकर, पोलीस नाईक महेश गायकवाड, गणेश महाडिक, दत्तात्रय बनसोडे, संदीप सकपाळ, सचिन गायकवाड, विशाल साळुंके, व चालक पोलीस कॉस्टेबल सचिन मोरे यांच्या पथकाने सापळा रचून आरोपीला अटक केली.