Breaking News

अभिनेते दिलीप कुमार यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश

मुंबई, 23 - ट्रॅजेडी किंग आणि दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांना वयाच्या 94 व्या वर्षी कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे. मुंबईच्या जिल्हा सत्र न्यायालयाने 18 वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणात दिलीप कुमार यांना आज (23 फेब्रुवारी) कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. 
त्यांच्या पत्नी आणि अभिनेत्री सायरा बानू यांनी ट्विटरवर याबाबतची माहिती दिली. दिलीप कुमार यांच्या चाहत्यांना दु:ख होत आहे की, 18 वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणात दिलीप साहब उद्या कोर्टात हजर राहणार आहेत. गिरगाव जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश बी एस खराडे हे या प्रकरणावर सुनावणी करणार आहेत, असे ट्वीट सायरा बानू यांनी दिलीप कुमार यांच्या ट्विटर हॅण्डलवरुन केले आहे.