केंद्रेकर यांच्याकडील आयुक्तपदाचा कार्यभार काढला
औरंगाबाद, 23 - सुनील केंद्रेकर यांच्याकडील मनपा आयुक्तपदाचा प्रभारी कार्यभार काढण्यात आला. केंद्रेकर यांच्या जागी पुण्याचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांची बदली करण्यात आली आहे.
दरम्यान, केंद्रेकर यांनी तीन महिन्यांतच मनपाच्या कारभाराला शिस्त लावत मोठ्या सुधारणा केल्याने नागरिकांनीही केंद्रेकर यांच्याकडे पूर्णवेळ कारभार देण्याची मागणी करत आंदोलनाची तयारीही दर्शवली होती.
19 नोव्हेंबर 2015 रोजी प्रकाश महाजन यांची बदली झाल्यावर सिडकोचे मुख्य प्रशासक (नवीन शहरे) केंद्रेकर यांच्याकडे आयुक्तपदाचा प्रभार सोपला होता. तीन महिन्यांच्या काळात केंद्रेकरांनी मनपाला शिस्त लावली होती. त्याची फळे दिसू लागली असतानाच आज त्यांच्याकडील आयुक्तपदाचा कार्यभार काढला. त्यांच्या जागी पुण्याचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया येत आहेत.