अजिंक्य चांदणे यांच्या नेतृत्वाखाली पाडळसिंगीत दलित अत्याचारा निषेधार्थ रास्ता रोको
बीड,दि. 7 - गायरान जमीनीतल्या मातंग समाजाच्या झोपड्या काहींनी पाडल्यानंतर या प्रकरणात दोषींविरोधात अॅट्रॅासिटी अॅक्टचा गुन्ळा दाखल करण्यात आला, परंतु मातंग समाजावर गेवराई पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला. सदरचा गुन्हा परत घ्यावा आणि गेवराई पोलिस ठाण्याचे पीआय गंदम यांना
निलंहबत करण्यात यावे या मागणीसाठी डीपीआयच्या वतीने बीड-जालना महामार्गावरीलपाडळसिंगी येथे जबरदस्त रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
दीड ते दोन तासांच्या रास्ता रोकोमुळे या महामार्गावरील वाहतुक काही काळ पूर्णतः ठप्प झाली होती. या रास्ता रोकोचे नेतृत्व अजिंक्य चांदणे यांनी केले.मादळमोही येथील गायरान जमीनीवर मातंग समाजाचे काही लोक झोपड्या बांधून राहत होते, मात्र 9 नोव्हेंबर रोजी काही लोकांनी त्यांच्या झोपड्यांची तोडफोड केली, यामुळे त्यावेळी त्याठिकाणी वाद निर्माण झाला होता. ज्या लोकांच्या झोपड्या पाडण्यात आल्या होत्या त्यांच्या फिर्यादीवरून दोषींविरोधात अॅट्रॅासिटी अॅक्टखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते. मातंग समाजावर अन्याय झाल्यानंतरही सांगण्यावरून या भागातील मातंग समाजावर दरोड्याचे गुन्हे दाखल केले. संबंधित पीडितांवर गेवराई पोलिसांनी अन्याय केला. याच्या निषेधार्थ काल डीपीआयच्या वतीने बीड-जालना रोडवरील पाडळसिंगी याठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. एक ते दीड तासाच्या या आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग नोंदविला होता. या आंदोलनामुळे या भागातील वाहतूक काही काळ पूर्णतः ठप्प झाली होती. या आंदोलनाचे नेतृत्व डीपीआयचे अजिंक्य चांदणे, सुभाष लोळगे, भारत कानडे, ब्रह्मदेव धुरंधरे, संदीप सुतार, हनुमान क्षीरसागर, भारत गायकवाड, मदन हतागळे, राजेंद्र धुमाळ यांनी केले. या वेळी गेवराईचे पीआय गंदम
यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली.