कोकण रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण रेंगाळले
मुंबई, 07 - गाजावाजा करत कोकण रेल्वेवरील दुहेरीकरणाच्या भूमिपूजनाचा नारळ खुद्द रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी फोडल्यानंतरही हे काम प्रत्यक्षात सुरू होण्यास मात्र आणखी सहा महिन्यांचा अवधी लागणार आहे. कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणाच्या कामाबाबत कागदोपत्री काम सुरू असून निविदा प्रक्रिया पूर्ण करून, प्रत्यक्ष काम मे महिन्यात सुरू होणार असल्याने दुहेरीकरणाचे काम आस्तेकदम असल्याचे समोर येत आहे.
कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणाच्या व विद्युतीकरणाच्या कामाचे भूमिपूजन 8 नोव्हेंबर 15 रोजी करण्यात आले होते. मात्र अद्याप या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली नसून हे काम सुरू होण्यास मे महिना उजाडण्याची शक्यता आहे. विद्युतीकरणाचे काम तांत्रिकदृष्टया गुंतागुंतीचे असल्याने त्याला आणखी वेळ लागेल, अशी माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी दिली. बेलापूर येथील कोकण रेल्वेच्या मुख्यालयात पत्रकारांसोबत झालेल्या चर्चेत त्यांनी ही माहिती दिली. समुद्र, टेकड्या, पर्वतांवर सहलबंदी, नवी नियमावली ाहनातूनच सहल न्यावी दहा विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक असावा.