जुलैमध्ये 12 वीच्या नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा - शिक्षण मंत्री
मुंबई, 01 - शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दहावीप्रमाणेच बारावीच्या नापास विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून त्यांचीही जुलै महिन्यातच परीक्षा घेण्यात येणार आहे.
दहावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, याकरिता नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जुलै 2015 मध्ये घेण्यात आली होती. त्याचपद्धतीने आता 2016-17 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 12 वीची फेरपरीक्षा सप्टेंबर-ऑक्टोबर ऐवजी जुलै-ऑगस्टमध्ये घेण्याचा निर्णय तावडेंनी घेतला आहे. या निर्णयामुळे 12 वीच्या नियमित परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेची संधी मिळणार आहे.