पत्रकार हल्ला विरोधी कायदा होण्यासाठी 10 मार्च पासून आंदोलन
अहमदनगर । प्रतिनिधी । 24 - पत्रकार हल्ला विरोधी कायदा व ज्येष्ठ पत्रकारांसाठी पेन्शन योजना सुरु होण्यासाठी सत्ताधारी व विरोधक टोळवाटोळवी करत आहे. याकरिता सरकारला आंदोलनाचा एक रेटा द्यावा लागणार आहे. सर्व पत्रकार एकजुट झाले तर हे मागण्या निश्चित मान्य होणार आहे. पत्रकारांना किमान 10 हजार रुपये पेन्शन मिळण्यासाठी व पत्रकार हल्ला विरोधी कायदा होण्यासाठी 10 मार्च पासून मोठे आंदोलन उभे करणार असल्याची घोषणा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक तथा नवनिर्वाचित मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी केली.
अहमदनगर शहर प्रेस 3लबच्या वतीने पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांची मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख, ज्येष्ठ पत्रकार मीनाताई मुनोत, पुणे विभागीय पत्रकार संघाचे सचिव शरद पाबळे, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग व्यासपिठावर उपस्थित होते.
एस.एम.देशमुख म्हणाले की, या अर्थसंकल्पीय अधीवेशनात पत्रकार हल्ला विरोधी कायदा होण्यासाठी व ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन मिळण्यासाठी राज्यातील आमदारांना आवाहन करण्यात आले आहे. नेमका विरोध कोणाचा समजावा म्हणून, सर्व आमदारांचे कायद्यास समर्थन असणारे पत्र घेऊन ते मुख्यमंत्रीकडे सादर करण्याचे कार्य समितीच्या वतीने चालू आहे. पेन्शनधारक जेष्ठ पत्रकारांची माहिती जनसंपर्क विभागाकडे नसल्याने ती यादी देखील समितीच्या वतीने सादर करण्यत येणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये ज्येष्ठ पत्रकारांना सुरु झालेल्या पेन्शन योजने प्रमाणे महाराष्ट्र राज्यात पेन्शन योजना सुरु न झाल्यास उच्च न्यायलयात याचिका दाखल करणार असल्याचा इशारा दिला व प्रेस 3लबच्या वतीने राबवण्यात येणार्या विविध उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
प्रास्ताविकात महेश देशपांडे महाराज यांनी प्रेस 3लबच्या वतीने राबवण्यात येणार्या विविध उपक्रमाची व मराठी पत्रकार परिषदेची माहिती दिली. पत्रकार हल्ला विरोधी कायदा होण्यासाठी समर्थन करणारे खा.दिलीप गांधी, आ.अरुण जगताप, आ.संग्राम जगताप यांचे लिखित पत्र घेऊन प्रेस 3लबचे अध्यक्ष मन्सूर शेख यांनी एस.एम.देशमुख यांच्याकडे सुपुर्द केले. हे पत्र पत्रकार हल्ला विरोधी कायदा होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात येणार आहे.उपस्थितांचे आभार विठ्ठल लांडगे यांनी मानले. हॉटेल फरहत येथे झालेल्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने पत्रकार, वृत्त छायाचित्रकार व इलेक्ट्रॉनिक मिडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते.