Breaking News

 पिंपरी (प्रतिनिधी)। 07 - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा यांचे संघर्षात्मक जीवनातील मूळ व्ही.डी.ओ . 3 डी अनिमेसन या प्रणालीद्वारे लोकांना दाखविण्यात येणार आहे. हा प्रकल्प डॉ. बाबासाहेब यांच्या मूळ अंबडवे या मूळ गावी साकार करण्यात येणार असुन तो लवकरात लवकर नागरिकांना समर्पित करण्याचा संकल्प वाढदिवसाच्या निमित्ताने करत असल्याची माहिती खासदार अमर साबळे यांनी पत्रकारांना दिली.
खासदार साबळे यांचा आज (रविवार) रोजी वाढदिवस असुन वाढदिवसानिमित्त झालेल्या आणि होणार्‍या कार्यक्रमाची माहिती देताना ते बोलत होते. यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, माजी अध्यक्ष सदशिव खाडे, महिला अध्यक्ष शैला मोळक, उमा खापरे, महेश कुलकर्णी, माऊली थोरात, विजय शिनकर, रघुनंदन घुले, निलेश निम्हण, संभाजी फुगे, संजय उदावंत, वेणू साबळे आदी उपस्थित होते.
खासदार साबळे म्हणाले, सांसद आदर्श गाव योजनेतुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव दत्तक घेतले आहे. याठिकाणी अनेक विकसात्मक कामाबरोबरच देशातक्रमांक एकचे गाव बनविण्यात येणार आहे. बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनात अनेक संघर्ष केला, लढे उभारले याचे चित्रीकरण त्यावेळी करण्यात आले होते. ते दुर्मिळ चित्रीकरण अंबडवे या मूळ गावी 3 डी अनिमेशन या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागरिकांना बघण्यास मिळणार आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचा संकल्प या वाढदिवसाच्या मदतीने करण्यात येणार असल्याचे खासदार साबळे यांनी सांगितले.
दरम्यान, वाढदिवसानिमित्त आज सकाळी गुळवे वस्ती भोसरी येथील आश्रम शाळेतील मुलांना अन्न धान्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच पांजरपोळ चौकातील पाताशाबाई रतनचंद लुंकड अंध शाळेतील मुलंना खाऊचे वाटप करण्यात आले. भाजपचे सुभाष सरोदे, संजय उदावंत, संतोष कसबे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सदाशिव खाडे, माऊली थोरात, विजय शिनकर, रवी लांडगे, संतोष लांडगे आदी उपस्थित होते. उद्या खासदार अमर साबळे यांच्या तर्फे रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात येणार आहे. तसेच सकाळी मोरया गोसावी येथे अभिषेक, काळेवाडी , पिंपळे सौदागर, कोकणे चौक, निगडी आदी ठकाणी आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.