स्त्रीचा सुंदर, सुडौल बांधा व सुंदरता
कोणत्याही संस्कृतीमधे स्त्री - सौंदर्याचे पोवाडे हे केवळ त्या स्त्रीच्या सुंदर मुखवट्यावरून गायले जात नाहीत तर त्या स्त्रीच्या सु-आरोग्ययुक्त शरीरयष्ठीचा त्यात संबंध असतो.
बारीक कंबर, सुरईदार मान, गोलाकार मनगटे, लांबसडक बोटे, सुडौल जांघे इ. शब्दात आपण त्यांचे वर्णन करू शकतो अथवा केलेले आढळते.स्त्रीचा देह हा कमनीय, पुष्ट, पण चपळ असणे म्हणजेच तिच्या सौंदर्याचे लक्षण मानले जात असे.पुरातन भारतीय ग्रंथांचा आधार घेता सुंदर स्त्रीचे नेत्र हे हरणाच्या डोळ्यांप्रमाणे वा कमलपुष्पाप्रमाणे असावेत. तिच्या मुखाची तुलना चंद्रमाबरोबर, तर हातांना कमलपुष्पाच्या लांबसडक दांडीची उपमा देतात, पाय पोटर्यांना कर्दळीच्या स्तंभांची उपमा दिलेली आढळते. यावरून स्त्रीचे सौंदर्य हे साकल्याने
विचारात घेता तिचा चेहराच नव्हे तर तिच्या पुर्ण कमनीय देहाचा विचारही येथे केला जावा.
जर आपण प्राचीन (भारतीय वा अन्य संस्कृतीतील) शिल्पकला वा चित्रकला यांची उदाहरणे विचारात घेतली की लक्षात येते, की यातील स्त्रीया कमनीय व सुडौल बांधा असलेल्या दाखविल्या गेल्या आहेत. प्राचीन वाड्ःमयातूनही अशाच प्रकारच्या सौंदर्याची चर्चा/वर्णने केलेली आढळतात. या जोडीस स्त्रीने मन, बुध्दी व शरीर यांचा विकास एकत्रीत रीतीने साधावा, हा हेतूही यातून स्प्ष्ट होत असतो.यासाठी अभ्यंग व मर्दन (मालीश) करून केलेले स्नान, योग, ध्यान-धारणा या सर्वांचा वापर करून शरीराचे सौंदर्य विकसित करण्याचे प्रयत्न केले गेलेले आढळतात.आधुनिक काळातील स्त्रियांनीदेखील या गोष्टींकडे आजही दुर्लक्ष करून चालणार नाही. तिनेदेखील आपल्या व्यग्र व व्यस्त जीवनातून वेळ काढून आपल्या शरीरयष्टीबाबत व सुडौल बांध्याबाबत विचार केला पाहिजे.
व्यायाम, आरोग्य व स्त्रीचे देहसौंदर्य या सर्वांचा सुरेख संबंध साधण्याचे प्रयत्न करावेत. यासाठी अनेक मार्ग, उपचार व उपकरणे उपलब्ध आहेत व त्यांचा वापरही त्यांनी करण्यास हरकत नसावी.लठ्ठपणाप्रत्येकीच्या जीवनात वयाच्या 25 ते 50 या वयोवर्षाच्या दरम्यान वजनात होणारी वाढ. ही कायमची असते. एकाच वयोगटातील स्त्रियाचं शरीरातील चरबीचे प्रमाण वाढून ठराविक प्रमाणाहून 10 टक्के वा त्याहून वाढले, तर अशा शरीरस्थितीस लठ्ठपणा म्हणता येईल.
1. अल्सर, आवड, सवय, छंद वा अशक्तता वाटणे यापैकी कोणत्याही एक वा एकाहून अधिक कारणांमुळे जर एखादी स्त्री अनावश्यक प्रमाणात आपला आहार वाढवत असेल (मुख्यत्वे करून जर त्यात अधिक प्रमाणात गोड, तळकट, तुपकट खाद्यपदार्थ असतील तर) तिचे वजन वाढतच राहते आणि तिचा लठ्ठपणा वाढतच जातो. 2. आनुवंशिकता हेदेखील वजन वाढण्याचे अजून एक कारण असते. काहीच्या शरीराची ठेवण अशी असते की, त्यांचे वजन थोडे जरी वाढले, तरी त्या खूप लठ्ठ वाटत रहातात.
3. काही वेळा एखादीच्या शरीरातील अंतःस्त्रावी ग्रंथीतील कंठस्थ वा वृक्कस्थ ग्रंथींसारख्या ग्रंथीच्या कार्यात बिघाड होतो व त्यामुळेच वजन वाढते.
4. स्त्रीच्या गर्भारपणात/बाळंतपणात जर नीट काळजी घेतली गेली नाही, मासिक पाळी जाण्याची वेळ आली, तरीदेखील वजन वाढते. या सर्वात महत्वाची बाब म्हणजे प्रत्येकीचा आहार किती आहे, या प्रमाणात तिचा व्यायाम हवा. तसेच जर आपला आहार योग्य नाही अथवा गरजेहून अधिक आहे असे वाटले, तर तो कमी करणे. कमी कॅलरीजचा आहार घेणे आवश्यक असते. जन्मत: आपली त्वचा कोमल, मुलायम असते. परंतु वाढत्या वयात प्रथिने, नैसर्गिक तत्वे यांची जी त्रुटी तिच्यात निर्माण होत जाते, त्यामुळे त्या साैंदर्यास बाधा येत जाते, सतत फास्ट फूड, कृत्रिम प्रसाधने यांच्या नादी लागल्याने व त्यांचा वापर केल्याने शरीरांतर्गत संतुलन बिघडते आणि त्वचेतील उपजत असणारी स्निग्धता व कोमलता संपुष्टात येते.
याखेरीज चिंता, तणाव, क्रोध, निराशा, उच्च रक्तदाब यापैकी कशाचीही शिकार जर ती स्त्री असेल, तर त्याचे विपरीत परिणाम तिच्या त्वचेवर झाल्याखेरीज राहत नाहीत. जेव्हा देह आहाराने संतुष्ट होईल, तेव्हाच प्रत्येकीस आत्मिक समाधानाचे सौंदर्य प्राप्त होईल व त्यामुळेच तिची त्वचा, डोळे, दात, नखे, केस, इ. चे सौंदर्य वाढेल. आपला कोठा साफ राहणे महत्वाचे असते. जर कोठा साफ राहिला नाही, तर त्या स्त्रीचे शरीर-स्वास्थ्य व सौंदर्य य दोहोंवर विपरीत परिणाम होत राहतो. आपण आपला दैनंदिन आहार असा ठेवावा की, ज्याचे सहजतेने पचन करता येईल. आपल्या चेहर्याच्याच नव्हे, तर सर्व बाह्य त्वचेच्या सौंदर्यांत भर पडण्यासाठी व ते वाढण्यासाठी पोटात सत्वे आपल्या पोटात जातात व त्वचेस मुलायमपणा, नाजूकपणा