Breaking News

पुरस्काराची रक्कम अपंग विद्यालयाला

 बुलडाणा (प्रतिनिधी) । 1 - समाजसेवा करण्यासाठी खुप काही करावे लागते  अशातला भाग नाही. तुम्ही ज्या ठिकाणी काम करीत आहात, ते करून सुध्दा समाजसेवा केली जावू शकते, याचे उदाहरण येथील द्धारका इन्स्टिट्युट ऑफ फार्मसीने प्रस्तुत केले आहे. कॉलेज अंतर्गत झालेल्या क्रिकेट स्पर्धेतील पुरस्काराची रक्कम अपंग मुलांवर खर्च करण्यात आली. काही दिवसांपूर्वी क्रीडा उपक्रमातंर्गत कॉलेजमध्ये क्रिकेटच्या मॅचेस झाल्या. त्यात डी.फार्म, द्धितीय वर्षाचे विद्यार्थी अजिंक्य राहिले. जीवनदीप राठोड, शुभव जाधव, अभिजीत गवई, सचिन आडवे, वैभव बाहेकर, आशिष कानडजे, स्वप्नील वाघ, मुबश्शीर खान, मोहम्मद उबैद, शेख नावेद आणि एफजुर रहेमान यांनी चांगले प्रदर्शन करीत क्रिकेट स्पर्धा जिंकली. याच कॉलेजच्या विद्यार्थीनी जयश्रीताई कुटे यांच्यातर्फे या टिमला 1100 रूपयांची राशी असलेला पुरस्काराची राशी समाजसेवेत खर्च करण्याची इच्छा या टिमने व्यक्त केली. ही रक्कम अपंग विद्यार्थ्यांनी साहित्य वाटून खर्च करावी, ही संकल्पना जयश्रीताईनी मांडली. याला सर्वानीच प्रतिसाद दिला. त्यानंतर सोमवार 24 जानेवारी अपंग कल्याण पुनर्वसन संस्थेत जावून पेन, पेन्सील, बिस्कूट अशा विविध वस्तु अपंग विद्यार्थ्यांमध्ये वितरीत करण्यात आल्या. याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून कॉलेजचे प्राचार्य डॉ.एस.पी.जैन तसेच भुसारी आणि जयश्रीताई कुटे उपस्थित होते. कार्यक्रमाला योगेश दांगोडे, आसिफ पठाण, अनिल कानडजे, ॠषभ अग्रवाल, राम चव्हाण, वैभव शेळके, अंकुश चिमकर, प्रिया गोळदे, पुष्पांजली गव्हाळे, अश्‍विनी हेलगे, अश्‍विनी केणे, ज्योती लोखंडे, नुजत सैय्यद, संध्या टेकाळे, पुजा सावळे, छाया अपार तसेच चि.हर्ष संजय कुटे यांची उपस्थिती लाभली.