Breaking News

दिवंगत कविवर्य जालंदर सोनूने स्मृतिदिनानिमित्त कवी संमेलन

 बुलडाणा (प्रतिनिधी), 1 - दिवंगत कविवर्य जालंदर सोनुने यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त कवी संमेलन व अनाथांना अन्नदान करण्यासाठी सेवा संकल्प परिवार बुलडाणा यांना रोख रक्कम देवून स्मृतिशेष जालंदर सोनुनेंना जिल्ह्यातील साहित्यीक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी केले अभिवादन.
स्थानिक जयभारती सार्वजनिक महिला वाचनालयात 27 जानेवारी रोजी 5 वाजता कविसंमेलनाचे आयोजन साहित्यीक सुदाम खरे व ग्रामीण साहित्य चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मधुकर ढवळे यांचया अध्यक्षतेत सुरू झालेल्या कवी संमेलनाला आझाद हिंद संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड.सतिशचंद्र रोठे, साहित्यीक कडुबा बनसोडे, अ‍ॅड.विजय कस्तुरे, सर्जेराव चव्हाण, माजी तहसिलदार डी.के.माने, शशिकांत ढवळे, संपादक दशरथ पनाड, सुभाष आराख, सावन जमादार यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम दिवंगत कविवर्य जालंदर सोनुने यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व द्धिपप्रज्वलन करून कवी संमेलनाला सुरूवात करण्यात आली. यावेळी स्वातंत्रसेनानी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल अ‍ॅड.सतिषचंद्र रोठे व साहित्यीक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सर्जेराव चव्हाण, सुनंदा चव्हाण आणि मधुकर ढवळे यांचा सापत्निक सत्कार  उपस्थित साहित्यीक व जयभारती वाचनालयाच्यावतीने शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देवून करण्यात आला. दिवंगत जालंदर सोनुने यांचा जिवनपट उलगडणार्‍या साहित्यीक रचना आणि काला पाणी काव्य संग्रहाचे सामुहिक वाचन करण्यात आले. सामाजिक विषमतेवर प्रहार करणार्‍या व साहित्य क्षेत्रातील दांभिकतेवर आघात करणार्‍या रचना उपस्थित कविंनी सादर करून रसिकांची मने हेलावून टाकली. सलग चार तास चाललेल्या कवी संमेलनात बुलडाणेकरांना विविध रचनांनी पर्वनी कविवर्यांनी दिली. सदर कविसंमेलनाला नामवंत कविंची उपस्थिती होती. या कविसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी भास्करराव जाधव, जागृती खरे जाधव, क्रांती खरे कंकाळ, सुभद्रा जाधव, कुंदा खरे, मनोज मोरे, आदेश कांडेलकर,   सपकाळ, प्रेमसिंग राजपूत, दिपक रोठे यांनी अथक परिश्रम घेतले.