समस्यांच्या निवारनार्थ तायडे यांचे आमरण उपोषण
बुलडाणा (प्रतिनिधी) । 1 - लाखनवाडा गावासह परिसरातील विविध समस्या सोडविण्यासाठी समाजसेवक व माजी सरपंच संताराम तायडे व मोहना येथील ग्राम तंटामुक्ती अध्यक्ष भाऊराव मखाराम जाधव यांनी लाखनवाडा वैद्यकिय केंद्र, खामगाव लाखनवाडा बससेवा,परिसरातील विविध समस्या सोडवाव्यात यासाठी 30 जानेवारी महात्मा गांधी पुण्यतिथी पासून जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे आमरण उपोषणास सुरूवात केली आहे.
यावेळी विविध मागण्यांचे एक निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. निवेदनात नमुद आहे की, लाखनवाडा येथील ग्रामीण रूग्णालयात 1 वैद्यकिय अधिक्षक, 3 वैद्यकिय अधिकारी अशा जागा मान्य असून त्यापैकी एकही जागा भरलेली नाही. तसेच अधिपरिचारिकाच्या 7 पैकी 5 जागा रिक्त आहेत व प्रयोगशाळा तंत्रज्ञाची जागा सुध्दा रिक्त आहे आणि क्ष किरण यंत्र सुध्दा बंद आहे,या रूग्णालयातील वरील समस्या सोडविण्यात याव्यात., खामगाव ते घारोड सुरू असलेल्या सर्व बसेस लाखनवाडा पर्यंत सोडण्यात याव्यात तसेच खामगांव ते जामनेर मुक्कामी बस मार्गे लाखनवाडा उंद्री बुलडाणा अजिंठा पहूर या मार्गे सुरू करावी आणि बुलडाणा ते शहापूर मागे्र उंद्री लाखनवाडा बोरी आडगांव ही बस सुरू करावी तसेच उंद्री येथील 3 मुक्कामी बसेस पैकी 1 बस लाखनवाडा मुक्कामी ठेवावी., खामगाव जळका तेली किन्ही महादेव अकोली या रस्त्याची दुरूस्ती करयात यावी तसेच धदम ते मोहना बु या 3/4 कि.मी. चा नविन रस्ता मंजूर करण्यात यावा., जि.प.हायस्कुल मधील मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचार्यांच्या रिक्त जागा भरण्यात याव्या व बंद पडलेले जि.प. कनिष्ठ महाविद्यालय पूर्ववत सुरू करण्यात यावे., लाखनवाडा गावाकरिता मन प्रकल्पावरून स्वतंत्र पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात यावी, लाखनवाडा येथे विज वितरण कंपनीचे नविन उपकेंद्र मंजूर करण्यात यावे, लाखनवाडा नियोजीत तालुक्याची लवकरात लवकर निर्मिती करण्यात यावी आदी मागण्यांसाठी त्यांनी उपोषण सुरू केले आहे.