दत्ता पडसलगीकरांनी पदभार स्वीकारला
मुंबई, 31 - मुंबईचे नवे पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी पदभार स्वीकारला आहे. पोलिस आयुक्तालयात वरिष्ठ आयपीएस अधिकारी पडसलगीकर यांनी पदाची सूत्रे स्वीकारली.
गुप्तचर यंत्रणा अर्थात ‘आयबी’मध्ये कार्यरत असलेल्या पडसलगीकर यांना पुन्हा ‘होम केडर’ म्हणजेच महाराष्ट्रासाठी रिलिव्ह करावे, असे पत्र महाराष्ट्र सरकारने केंद्रीय गृहविभागाला पाठवले होतं. त्यामुळे जावेद अहमद यांच्यानंतर आता मुंबई पोलीस प्रमुखपदाची माळ दत्ता पडसलगीकर यांच्याच गळ्यात पडली आहे. पडसलगीकर दिल्लीत इंटेलिजन्स ब्युरोत कार्यरत होते. ते 1982 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
पडसलगीकर मुंबईच्या लोकलमधील साखळी स्फोटांच्या तपास पथकात होते.