बिरदवडीमध्ये श्रामणेर शिबिराची सांगता
राजगुरूनगर (प्रतिनिधी) । 08 - मध्ये भव्य मिरवणूक, पंचशील व विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी दहा दिवसीय श्रामनेर शिबिराची सांगता करण्यात आली. यावेळी गावातून धम्म रॅली काढण्यात आली होती. या रॅलीचा समारोप बुद्ध विहाराजवळ झाला. यानंतर सामुहिक धम्मवंदना व महापुरुषांचे प्रतिमा पुजन करण्यात आले.या वेळी खेड तालुक्यातील तमाम आंबेडकरी जनतेने हजेरी लावली होती .
भारतीय बौद्ध महासभेच्या खेड तालुक्याच्या शाखेच्या वतीने या शिबिराचे आयोजन बिरदवडी (ता.खेड) येथील बुद्धविहारात करण्यात आले होते. दहा दिवस चाललेल्या या शिबिरामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षकांनी मार्गदर्शन केले. या शिबिराच्या सांगता समारंभाच्या वेळी विद्युत रोषणाईने सजविलेल्या रथातून आंबेडकर व गौतम बुद्धांच्या प्रतिमांची व श्रामनेर संघासह मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकी मध्ये देशभरातील भन्तेजी, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड, माजी जिल्हाध्यक्ष दादासाहेब रणपिसे, केंद्रीय शिक्षक व तालुकाध्यक्ष लक्ष्मण दुधवडे (गुरुजी), कोषाध्यक्ष सिद्धार्थ बापू गोतारणे, सरचिटणीस विशाल गायकवाड रमेश गोतारणे, अशोक कडलग, प्रदीप नवरे, सुरेश गोतारणे, दत्ता गोतारणे, बाळासाहेब मोरे आदींसह तमाम बौद्ध महिला व पुरुष सहभागी झाले होते. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने घेण्यात आलेले हे शिबीर यशस्वी होण्यासाठी श्रीकांत गायकवाड, विजय भवार, संजय भालेराव, दादू सोनवणे, प्रदीप नवरे, संजय गायकवाड, सीमा गोतारणे, अक्षय गोतारणे आदींनी विशेष परिश्रम घेतले. तालुक्यात दहा दिवस चाललेल्या श्रामनेर वर्गातील अनुभव महासभेचे अध्यक्ष लक्ष्मण दुधवडे, सिद्धार्थ गोतारणे यांनी या
वेळी सांगितले.