Breaking News

जळगाव शहरात विविध ठिकाणी पत्रकार दिन उत्साहात साजरा


 जळगाव/प्रतिनिधी। 8 - समाजातील प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी सकारात्मक पत्रकारिता आवश्यक असते यामुळे खर्या अर्थाने समाजाची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगती होत असते. त्यामुळे सुद्ृढ समाजनिर्मितीसाठी सकारात्मक पत्रकारिता आवश्यक असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनी व्यक्त केले. पत्रकार दिनानिमित्त पत्रकार भवनात ’प्रसार माध्यमे आणि विकास’ या विषयावर त्यांच्या व्याख्यानाचे झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा मराठी पत्रकारसंघाचे अध्यक्ष विजय पाटील होते. यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, ज्येष्ठ पत्रकार त्र्यंबक कापडे, आनंद आंबेकर, हेमंत आलोने, प्रमोद बर्हाटे, धों.ज.गुरव, दिलिप तिवारी, गौतम संचती, हेमंत पाटील, सतीश अग्रवाल, पांडुरंग महाले, नरेंद्र कदम, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद दुसाने, पत्रकार संघाचे कार्यवाहक अशोक भाटीया उपस्थित होते. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. यानिमित्ताने रक्तदान शिबिर, कॅन्सर जागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी पत्रकार मोठया संख्येनेउपस्थित होते.
मू.जे. महाविद्यालय
मू.जे. महाविद्यालयात पत्रकार दिनानिमित्त जनसंवाद आणि वृत्तविद्या विभागातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी होते.सुरुवातीला मराठी पत्रकार सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ पत्रकार ओमप्रकाश तिवारी, विशाल चढ्ढा, उपप्राचार्य एन.व्ही. भारंबे, विभागप्रमुख प्रा. विनोद निताळे. डॉ. गोपी सोरडे, प्रा. राजेश वाघुळदे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमात मागील वर्षी जनसंवाद आणि पत्रकारितेत गुणवत्ता यादीत आलेले महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जनसंवाद आणि पत्रकारिता विभागात दर्पण दिनानिमित्ताने ’इलेक्ट्रॉनिक माध्यमात व वृत्तपत्र माध्यमातील महिला पत्रकारांसमोरील आव्हाने आणि संधी’ या विषयावर परिसंवाद झाला. यावेळी वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक माध्यमातील सरिता खाचणे, मनीषा मोहोड, यामिनी कुलकर्णी, मोहिनी सोनार, प्रा. डॉ. मनीषा इंदाणी, डॉ. तुकाराम दौड मंचावर उपस्थित होते.