पत्रकार दिन साजरा
येवला/प्रतिनिधी। 8 - पत्रकारांनी सामाजिक बांधिलकीचे भान ठेऊन वृत्त द्यावे, असे आवाहन आमदार संजय सावकारे यांनी बुधवारी केले. शहर पत्रकार संस्थेतर्फे माळी भवनात आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. अतिरंजित, समाजमन बिघडविणारे वृत्त देण्याचा मोह टाळावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रमुख वक्ते म्हणून प्रा.निरंजन आवटे, प्रमुख अतिथी नगराध्यक्ष अख्तर पिंजारी, उपविभागीय अधिकारी विजय भांगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिदास पवार, तहसीलदार हरीश भामरे उपस्थित होते. पत्रकार शेखर पाटील यांनी आधुनिक माहिती तंत्रज्ञान व पत्रकारिता विषयावर मार्गदर्शन केले. दीपप्रज्वालन ’दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. शहर पत्रकार संस्थेचे अध्यक्ष संजयसिंग चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. प्रा.आवटे यांनी बदलत्या काळातील प्रिंट मीडियासमोरील आव्हाने या विषयावर विचार व्यक्त केले. माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, माजी उपनगराध्यक्ष विजय चौधरी, हाजी मुन्ना तेली, प्रा.सुनील नेवे, भीमराज कोळी, बाजारपेठचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, नगरसेवक प्रा. दिनेश राठी, नगरसेवक निर्मल कोठारी, गटशिक्षणाधिकारी विजय पवार, नगरसेवक राजेंद्र आवटे, उल्हास पगारे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कैलास महाजन, नाना पवार, उपजचे सुरेंद्र चौधरी, सेवानवृत्त मुख्याध्यापक शांताराम पाटील उपस्थित होते. पत्रकार आनंदा पाटील, गिरीश नेमाडे, छायाचित्रकार इकबाल खान यांचा सत्कार झाला.
शहर पत्रकार कार्यकारिणीचे संजयसिंग चव्हाण, उपाध्यक्ष प्रकाश तायडे, सचिव हेमंत जोशी, खजिनदार विनय सोनवणे, उत्तम काळे, देवीदास वाणी, प्रेम परदेशी, संतोष शेलोडेश, किशोर शिंपी यांचा सत्कार करण्यात आला.