Breaking News

जिल्ह्यात गरज भासेल तेथे चारा छावणी - पंकजा मुंडे

गेवराई, 31 - मुक्या जनावरांची सेवा ही ईश्‍वरसेवा आहे. त्यामुळे जिल्ह्यात जेथे गरज भासेल त्या ठिकाणी चारा छावणी सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी येथे दिली.  
शहरातील जातेगाव रोडवरील चारा छावणीचे उद्घाटन मंगळवारी त्यांच्या हस्ते झाले, त्या वेळी त्या बोलत होत्या. आमदार लक्ष्मण पवार, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा, उपाध्यक्ष गोरख धुमाळ, नगराध्यक्ष महेश दाभाडे, प्रकाश सुरवसे, भगवान  खेडकर, किशोर कांडेकर आदींसह शेतकरी, पदाधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री मुंडे म्हणाल्या, की चारा छावणीची भविष्यात आपल्याला गरज पडू नये यासाठी आम्ही जलयुक्त शिवार योजनेतून नियोजन करीत आहे. या योजनेचे काम महाराष्ट्रात प्रभावीपणे होत आहे. यापूर्वी ही कामे फक्त कागदावरच होत होती. जिल्ह्यात सिमेंट बंधार्‍याच्या कामासाठी 80 क
ोटींचा निधी दिला आहे. त्यामुळे भविष्यात ही परिस्थिती निर्माण होणार नाही. छावणीतील पशुधनाची  चांगली काळजी घेण्याच्या सूचना देऊन छावणीमुळे पशुपालकांना दिलासा मिळाल्याचे सांगितले.