शहरात चोरट्यांचा धुमाकुळ; व्यापर्यांमध्ये खळबळ
अहमदनगर । प्रतिनिधी । 1 - शहरातील मध्यवर्ती भागात म्हणजेच कोतवालीच्या हद्दीत चोरट्यांनी माळीवाड्यातील महालक्ष्मी मंदिरासमोर असलेल्या वाडीयापार्क येथील तीन दुकाने फोडली असून पोलिसांपुढे ऐक आव्हान उभे केले आहे. शहरातील 24 तास वर्दळीच्या ठिकाणी चोरी झाल्याने आणि एकाच दिवशी तीन दुकाने चोरट्यानी फोड्यल्याने व्यापार्यांमध्ये दशहत निर्माण झाली आहे.
वाडीयापार्क इमारतीत श्रीकांत अशोक रसाळ यांचे रसरंग जनरल स्टोअर्स हे दुकान आहे. त्याचे शहर उचकटून गल्ल्यातील रोख 7 हजार रुपये आणि त्यासह इतर साहित्य चोरट्यांनी लंपास केले आहे. तसेच दुकानातील इतर मालाचीही नासधुस केली आहे. तसेच किराणा साहित्याचीही चोरट्यांनी नासधुस केली आहे. त्याच दरम्यान मारुती आनंदराव शिंदे याचे त्याच ठिकाणी शुभम टेलिकम्युनिकेशन अॅण्ड सेल्स व वाहनांच्या बॅटरीचे दुकान आहे. त्यांचेही शटर उचकटून बॅटरी पळविल्या आहेत. तर अनिकेत मंजाबा सुडके यांचे शॉप नं.64 समाधान मोबाईल शॉपी त्याच रात्री चोरट्यांनी फोडली आहे. एकाच रात्री तीन घटना घडल्याने व्यापर्यांमध्ये खळबळ उडाली आहे. तर पोलिसांपुढे चोरट्यांनी एकाच रात्री तीन दुकाने फोडुन पोलिसांना एक प्रकारे आवाहनच दिले असल्याची चर्चा सध्या शहरात सुरु आहे.
शहरामध्ये पोलीसांनी सध्या काळ्यांधंद्यांवर आपली वक्रदृष्टी केल्याने चोरट्यांनी डाव साधला असुन पोलिसांना एक प्रकारे आवाहन उभे केले आहे. शहरातील मध्यवर्ती आणि त्यातली त्यात कायम गजबजलेल्या ठिकाणी चोरट्यांनी चोरी करुन एक विक्रमच केला आहे. गजबजलेल्या ठिकाणी चोरी अनपेक्षित असली तरी आता गजबजलेल्या ठिकाणीही चोर्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दोन दिवसात थंडीने मान टाकल्याने याचा फायदा चोरट्यांनी घेतला आहे. शहरात सध्या अवैध्य धंद्यावर पोलिसांनी कारवाईचे सत्र सुरु केले असुन मटका, जुगार अड्यांवर धाडी टाकल्या आहेत. याचा फायदा उचलत चोरट्यांनी डाव साधला असल्याची चर्चा आहे.