राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निबंध स्पर्धांचे आयोजन
नाशिक /प्रतिनिधी। 8 - भारत निवडणूक आयोग व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार 25 जानेवारी 2016 रोजी राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून यानिमित्ताने जिल्हाधिकारी व जिल्हानिवडणूक अधिकारी यांच्यातर्फे जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धा 7 वी ते 10 वी आणि महाविद्यालयीन अशा दोन स्तरावर घेतली जाणार आहे. स्पर्धेसाठी इल्क्लुझिव्ह अँड क्वॉलीटेटीव्ह इलेक्ट्रोल पार्टिसिपेशन, इझी रजिस्ट्रेशन, इझी करेक्शन (सहज नोंदणी ; सहज दुरुस्ती), जागरुक मतदार, लोकशाहीचा आधार, मतदान-अधिकार की कर्तव्य आणि एथीकल वोटींग असे विषय आहेत. या विषयांवर मराठी किँवा इंग्रजीत 1000 शब्द मर्यादेत निबंध लेखन करून जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत 12 जानेवारी 2016 रोजी सायंकाळी 5 वाजेर्पंत पाठवावेत. पाकीटावर आपला पुर्ण पत्ता लिहावा. पहिल्या तीन सर्वोत्कृष्ट निबंधास राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमात सन्मानपत्र व मानचिन्ह देण्यात येईल. स्पर्धेत अधिकाधीक विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
सावित्रीबाई फुले जयंती
सावित्रीबाई फुले जयंती व महिला मुक्तिदिनानिमित्त त्रिरत्न बुद्धविहार स्वारबाबानगर, सातपूर येथे नेत्रतपासणी व चष्मावाटप कार्यक्रम संपन्न आला.