कला जोपासून त्यांची उपासना केल्यास जीवनात आनंद ः आ.जगताप
अहमदनगर । प्रतिनिधी । 1 - देखो देखो क्या वो पेड है..., आंम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर..., नाच रे मोरा..., पिंगा ग पोरी पिंगा..., बरसो रे मेघा बरसो..., लल्लाटी भंडार...कहते हे हमे प्यारसे इंडियावाले... आदी हिंदी, मराठी गीतांवर विद्यार्थ्यांनी एकाहून एक सरस सादरीकरण करत उपस्थितांच्या डोळ्याची पारणे फेडली. प्रत्येक गाण्यापुर्वी विद्यार्थ्यांनी दिलेला सामाजिक संदेश, पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी नाटिका व कला संगिताचे प्रात्यक्षिक दाखवत विद्यार्थ्यांनी आपल्या कला, गुणांसह कौशल्याची चुणूक दाखवली. या बहारदार नृत्याविष्कार व भरगच्च कार्यक्रमांनी ग्रामस्थ भारावले. निमित्त होते पब्लिक स्कूल वाळूंजच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे.
नगर तालुक्यातील वाळूंज येथील सबाजीराव गायकवाड कृषी विकास प्रतिष्ठाण संचलित पब्लिक स्कूल वाळूंज या इंग्रजी माध्यम शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन सरस्वती पुजनाने आ.अरुण जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर अभिषेक कळमकर, संस्थेचे अध्यक्ष सबाजीराव गायकवाड, सचिव प्रशांत गायकवाड, मार्केट कमिटीचे संचालक अभिलाष घीगे, ज्ञानदीप विद्यालयाचे मुख्याध्यापक भाऊसाहेब रोहकले, किरण दरेकर, उपसरपंच अमोल गायकवाड, कर्नल परब स्कूलच्या प्राचार्या परब मॅडम, श्रीमती टेमकर, आनंद कटारीया, जाधव सर, संतोष म्हस्के, बहादुर्गे सर, उमेश रासकर, राजेंद्र घोडके, भगवानराव मते, प्रभाकर नाना भांमरे आदी व्यासपिठावर उपस्थित होते.आ.अरुण जगताप म्हणाले की, शाळेय शिक्षणा बरोबर विद्यार्थींनी व्यायामाला महत्त्व दिले पाहिजे. एखादी कला जोपासून त्याची उपासना केल्याने जीवन आनंदी बनते. शाळेच्या व्यायामशाळेसाठी आमदार निधीतून मदत करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले. व ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रचार, प्रसार करुन इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण देत असल्याबद्दल संस्थेचे कौतुक केले.