सांगलीतील रिक्षा सौंदर्य स्पर्धेत रावलसाबच्या रिक्षाला प्रथम क्रमांक
सांगली ः दि. 7 - माधवनगर (ता. मिरज) येथील जिल्हा परिषद सदस्य शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या रिक्षा सौंदर्य स्पर्धे सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील रिक्षा चालकांनी बाजी मारली. सोमवारी रात्री झुलैलाल चौकात या स्पर्धा झाल्या.
सांगली, कोल्हापूर व सातारा या तीन जिल्ह्याच्या गटात खुला गट व केवळ सांगली जिल्हा खुला गट व केवळ सांगली जिल्हा खुला गट अशा दोन गटात या स्पर्धा झाल्या. तीन जिल्ह्यांच्या गटात दीपक पवार (कोल्हापूर) यांच्या रिक्षाने (क्र. एमएच 09, जे 7575) प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांची रिक्षा वातानुकूलित होती. रिव्हर्स कॅमेरारी होता. रिव्हर्स गिअर टाकल्यानंतर दर्शनी बाजूस मोठी स्क्रीन आहे.
या स्क्रीनवर त्यांना रस्त्यावरील पाठीमागचे दिसते. तसेच रिक्षात 26/11 मध्ये शहीद झालेल्या पोलीस अधिकार्यांची छायाचित्रे लावली आहेत. अनिल पोवार (रा. कोल्हापूर) यांच्या रिक्षाने (क्र. एम.एच. 09 जे 7775) दुसरा क्रमांक मिळविला. त्यांचीही रिक्षा वातानुकूलित होती. 26/11 मध्ये शहीद झालेल्या पोलीस अधिकार्यांची छायाचित्रे, साऊंड सिस्टीम व माशाची पेटी ठेवण्यात आली होती. मुस्ताक पेंटर (सातारा) यांच्या रिक्षाने (क्र. एमटीक्यू 7677) तृतीय क्रमांक पटकाविला. त्यांची रिक्षा 1984 मॉडेलची आहे. पुढच्या इंजिनच्या या रिक्षाने लक्ष वेधून घेतले. रिक्षात त्यांनी सातारा जिल्ह्यातील गडदर्शन (छायाचित्रे) लावली आहेत. स्पर्धेला जाताना ते प्रत्येकवेळी रिक्षाचा रंग बदलतात.
सांगली जिल्हा खुल्या गटात पैगंबर रावलसाब (सांगली) यांच्या रिक्षाने (क्र. एम.एच. 10 के. 4576) प्रथम क्रमांक मिळविला. त्यांनी रिक्षावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. पाठीमागे मुंबई एक्स्प्रेस लिहिले आहे. रिक्षात रिव्हर्स कॅमेरा आहे. राजवाडा चौकातील गणेशदुर्ग गणेश मंदिराचे छायाचित्र लावले आहे.
इस्माईल मिर्झा (मिरज) यांच्या रिक्षाने (क्र. एम.एच. 10 के. 4635) व अजित भोसले (क्र. एम.एच. 10 जे 2559) या रिक्षाने तृतीय क्रमांक मिळविला.
विजेत्या रिक्षाचालकांना रणजित सावर्डेकर यांच्याहस्ते बक्षीस देण्यात आले. खा. संजयकाका पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी स्पर्धेच्या ठिकाणी भेट दिली.