जिल्ह्यातील 87 गावात रब्बीची पैसेवारी जाहीर
सांगली ः दि. 7 - जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चार्याची समस्या निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने रब्बी हंगामातील आणेवारी घोषित केली असून जत व आटपाडी तालुक्यातील 87 गावांता यात समावेश करीत दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. शासनाकडे सादर केलेल्या या यादीस मंजुरी मिळाल्यानंतर या गावांनाही टंचाईसदृश गावांसाठी लागू असणार्या सवलती मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. दरम्यान, यापूर्वी खरीप हंगामाच्या आणेवारीवर घोषित केलेल्या जिल्ह्यातील 425 गावांना दुष्काळसदृशच्या सवलती मिळत आहेत.
प्रशासनाने 31 डिसेंबरला परिपत्रक प्रसिध्द करीत, रब्बी हंगामातील पन्नास पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांची यादी शासनाला सादर केली आहे. यादीत जाहीर गावे पुढीलप्रमाणे ः जत तालुका ः जत, अमृतवाडी, बिळूर, देवनाळ, मेंढेगिरी, उमराणी, खोजनवाडी, कुडणूर, शेगाव, निगडी खुर्द, बागलवाडी, वळसंग व्हसपेठ, कराजनगी, मायथळ, घोलेश्वर, कुणीकोणूर, संख, खंडनाळ, गोंधळेवाडी, तिकोंडी, करेवाडी (ति.), पारधेवस्ती कों. बोबलाद, कोणबगी, मोटेवाडी (को.), अंकलगी, कुलालवाडी, आंगी तुर्क, कागनरी, मोटेवाडी (आ.), धुळकरवाडी, मोरबगी, जालिहाळ बु., दरीबडची, लमाणतांडा (द.ब.), करजगी, सुसलाद, बेळोंडगी, सोनलगी, माणिकहाळ, आक्कळवाडी, उमदी, बोर्गी बु., बोर्गी खु., विठ्ठलवाडी, गुलगुंजनाळ, बालगाव, हळ्ळी, उटगी, निगडी बु., लमाणतांडा उटगी, गिरगांव, लवंगा, बेवनूर, रेवनाळ, अचकनहळ्ळी, कासलिंगवाडी, कुंभारी, मुचंडी, सिध्दनाथ, जालिहाळ खुर्द, पांढरेवाडी, शेड्याळ, रावळगुंडवाडी, उंटवाडी, सोरडी, दरीकोण ूर, गुड्डापूर, आसंगी.
आटपाडी तालुका ः आटपाडी, पुजारवाडी (आ.), भिंगेवाडी, मापटे मळा, देशमुखवाडी, माडगुळे, य.पा. वाडी, खानजोडवाडी, लेंगरेवाडी, मासाळवाडी, पिंपरी खुर्द, आंबेवाडी, शेटफळे, पात्रेवाडी, तडवळे, बनपुरी, करगणी.
कमी पैसेवारी घोषित झालेल्या या गावांना शासनांच्या आदेशानंतर सवलती मिळणार असल्याने, दुष्काळाच्या झळा सोसणार्या भागाला थोडाफार दिलासा मिळणार आहे. शासनाच्या मदतीकडे आता शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.