Breaking News

डिजिटल अंगणवाडी तरुणांचा संकल्प कौतुकास्पद ः मते

 अहमदनगर । प्रतिनिधी । 1 - औरंगाबाद रोडवरील गजराजनगर अंगणवाडीचे नवीन बांधकाम आ.शिवाजीराव कर्डिले यांनी मार्गी लावले. त्यांच्या या कार्यामुळे नवीन अंगणवाडी मिळाली. या अंगणवाडीला संपूर्ण रंगकाम, चित्रे काढून देण्याचे काम येथील सामाजिक कार्यकर्ते बबलू सूर्यवंशी यांनी करताच छोटू परदेशी यांनी 35 मुला-मुलींना नवीन ड्रेस-बूट व आयकार्ड देत ही अंगणवाडी डिजिटल करण्याचा संकल्प केला हा तरुणांचा संकल्प निश्‍चित कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन अंगणवाडी सेविका अनिता मते यांनी केले.
सामाजिक कार्याची आवड असलेले सूर्यवंशी व परदेशी यांनी आपले वाढदिवस साजरे न करता त्या रकमेतून हे काम केले. याबद्दल गजराजनगर रहिवासीयांच्यावतीने  प्रजासत्ताकदिनी त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आणि विशेष सत्कार करुन त्यांच्या कामाचे कौतुक केले. श्री.सुर्यवंशी यांनी जि.प.प्राथमिक शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटप केले. आ.कर्डिले यांनी जि.प.प्राथमिक शाळेला संरक्षक भिंत, नवीन अंगणवाडी इमारत उभारणीसाठी मोठा हातभार लावला. काही सामाजिक संस्था, मंडळे या अंगणवाडीसाठी लहान-मुलांसाठी मदत करणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. यावेळी विशाल सुर्यवंशी, सर्जेराव आठवले, राजु ठाणगे, शक्ती कांबळे, अक्षय सकट व परिसरातील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिनाक्षी तुपे, जाधव मॅडम यांनी परिश्रम घेतले.