महापालिका क्षेत्रात 40 हजार घरे घरपट्टीविना
सांगली ः दि. 7 - महापालिकेने तीन महिन्यांपासून शहरातील मालमत्तांचा सर्व्हे सुरू केला आहे. या प्राथमिक सर्व्हेत सुमार 40 टक्के नागरिकांनी नव्याने बांधकामे केली असून, त्यांची घरपट्टी विभागाकडे नोंदच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संपूर्ण मालमत्तांचा सर्व्हे झाल्यास सुमारे हजार घरे घरपट्टीविनाच आढळून येतील, असा अंदाज आहे. त्यामुळे महापालिकेला दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे.
महापालिका हद्दीत बेकायदा बांधकामांचा वेलू गगनावर पोहोचला आहे. अनधिकृत बांधकामांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यात मूळ इमारतीत बदल करून अनेकांनी वाढीव बांधकाम केले आहे. पण त्याची महापालिकेच्या घरपट्टी विभागाकडे नोंद नाही. घरपट्टी विभागातील काही कर्मचार्यांच्या आशीर्वादाने हा सारा प्रकार सुरू आहे. त्याला आळा घालण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी आयुक्त अजिज कारचे यांनी मालमत्तांचा सॅम्पल सर्व्हे करण्याची मोहीम हाती घेतली.
त्यात आयुक्त, उपायुक्तांपासून वरिष्ठ अधिकार्यांना सहभागी करून घेतले होते. गेल्या तीन महिन्यात 7172 मालमत्तांचा सर्व्हे झाला आहे. त्यातील 611 मालमत्ताधारकांनी वाढीव बांधकाम केले आहे, तर नवीन बांधकामे झाल्याचे आढळून आले. या प्राथमिक सर्व्हेत सुमारे टक्के नागरिकांनी मूळ इमारतीत बदल करून वाढीव बांधकाम केले आहे, तर 1407 टक्के नवीन बांधकामे झाल्याचे आढळून आले. या प्राथमिक सर्व्हेत सुमारे 9 टक्के नागरिकांनी मूळ इमारतीत बदल करुन वाढीव बांधकाम केले आहे, तर 25 टक्के नवीन बांधकामे झाली आहेत. विशेष म्हणजे या नव्याने झालेल्या बांधकामांची नोंदच घरपट्टी विभागाकडे नाही.
हा प्रकार धक्कादायक आहे. सर्व्हेत आढळलेल्या नव्या बांधकामांना घरपट्टी लागू केल्यास महापालिकेला 74 लाख 38 हजार रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.
याच धर्तीवर शहरातील 1 लाख 12 हजार मालमत्तांचा सर्व्हे करण्याचा विचार पुढे आला आहे. संपूर्ण सर्व्हे झाल्यास एकूण मालमत्ताधारकांच्या 34 टक्के म्हणजे सुमारे 40 हजार घरे कराविनाच आढळून येणार आहेत.