Breaking News

452 घरकुलांना 55 लक्ष 30 हजार रुपये मंजूर


 येवला /प्रतिनिधी। 8 - येवला तालुक्यातील गेल्या 3 ते 4 महिन्यापासून घरकुलाचे मा. प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नाशिक यांच्या पाठपुरावा करुन जिल्हा परिषद सदस्य प्रविण गायकवाड यांनी हा निधी उपलब्ध करुन घेतला आह.े घरकुल मंजुर झालेल्या लाभार्थींना 3 ते 4 महिन्यापासून पंचायत समिती मध्ये येरझारा मारुन थकले होते. आपण उसनवारी करुन आणि उधार घेतल्या. विठा, वाळु, सिमेंट वाल्यांकडून गरीब लाभार्थींना तगादा लावण्याने घरकुलाचे लाभार्थींना तगादा लावण्याने लाभार्थींना मोठी समस्या निर्माण झाली होती. त्यातच दुष्काळामुळे आपल्या हाताला काम नसल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. परंतु आता त्यांना आपली घर पुर्ण करण्यासाठी मोठी मदत होणार आहे. ज्या लाभार्थींना आपले घरकुलाचे पैसे बाकी आहे, त्यांनी आपला हप्ता मागणी करुन आपले घरकुल पूर्ण करावे, असे आवाहन प्रविण गायकवाड यांनी केले आहे. तसे आपल्या घरकुलांचा तीसरा हप्ताही लवकरच मागणी करणार आहे. त्याची अडचण निर्माण होऊ देणार नाही असे गायकवाड यांनी सांगितले आहे. तीसर्या हप्त्याची रक्कम लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल. 
तसेच येवल्यातील जे लाभार्थी घरकुलापासून वंचीत राहीले आहे. अनु. जमाती 933, अनुसुचीत जाती 384, इतर मागस वर्गीय 2850 हे घरकुलाचा प्रस्ताव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे सादर केला असून ना. भुजबळ यांच्या प्रयत्नातुन हे घरकुल लवकर मंजुर होती याचा पाठपुरावा पंचायत समिती व जिल्हा परिषद कडून चालु आहे. असे प्रविण गायकवाड यांनी सांगितले.