Breaking News

जि. प. शाळेच्या 2 लाख विद्यार्थ्यांची फेब्रुवारीमध्ये मोफत तपासणी

सांगली ः दि. 1 - जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दोन लाख विद्यार्थ्यांची फेब्रुवारी महिन्यात मोफत तपासणीचा निर्णय आरोग्य समितीत घेण्यात आला. राजारामबापू पाटील स्मृती आरोग्य शिबिर अंतर्गंत ही तपासणी होणार आहे. दूषित पाण्यामुळे अतिजोखमीच्या 12 गावांत तातडीने उपाययोजना करण्याबाबत चर्चा झाली. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वतंत्र आरोग्य अधिकारी देण्याची मागणी सदस्यांनी केली.
आरोग्य सभापती गजानन कोठावळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, सदस्य नामदेव माळी, राजेंद्र माळी, किसनभाऊ जानकर, निशा पाटील, राजेंद्र पाटील, रुपाली पाटील, सुवर्णा पिंगळे, सभापती विजय कांबळे यांनी चर्चेत भाग घेतला. आरोग्य विभागातर्फे 10 फेब्रुवारीला 6 ते 19 वयोगटातील मुलांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. प्रथम शाळेत आणि 15 फेब्रुवारीपासून घरोघरी वाटप करण्यात येणार आहे. पल्स पोलिओच्या पहिल्या टप्प्यात 101 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पार पडले आहे. मिशन इंद्रधनुष्य लसीकरण योजना 7 फेब्रुवारीपासून सुरु करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात गेल्या महिन्यात दूषित पाण्याच्या तपासणीत 57 गावांतील पाणी नमुने दूषित सापडले तर गेल्या वर्षी 12 गावे अतिजोखमीची आहेत. तेथे उपाययोजनांबाबत विचार झाला. आरोग्याच्या 383 जागांपैकी 333 जागा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. 5 ठिकाणच्या अतिक्रमणातील 3 काढण्यात यश आले आहे. विभागाच्या 28 बांधकामातील 8 कामे अंतिम टप्प्यात सुरु आहेत. 19 कामे प्रगतीपथावर आहेत.