Breaking News

ओझरखेड पर्यटन स्थळाचे काम निधीअभावी रखडले

महाराष्ट राज्य पर्यटन विकास महामंडळ यांच्या वतीने गुजरात राज्यातील सापुतारा या धर्तीवर दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड गांव व धरण परिसरात पर्यटनस्थळ जाहीर करून 2013 मध्ये तत्कालीन पर्यटन मंत्री छगनराव भुजबळ यांनी पहिल्या टप्यात 5 कोटी 88 लाख रुपये मंजूर केले. व त्यांच्या हस्ते उद्घाटन करून कामाला सुरुवात पण झाली.पहिल्या टप्यातील80 टक्के काम पूर्ण झाले असून एकूण रकमेपैकी 3 कोटी 82 लाख रुपये प्राप्त झाले असून 2 कोटी 6 लाख रुपये निधी अजून न मिळाल्याने काम रखडले आहे.या कामाला उर्वरीत निधी मिळावा अशी मागणी ओझरखेड चे सरपंच गंगाधर निखाडे यांनी केले आहे

पर्यटनस्थळ होण्यासाठी जेष्ठ नेते श्रीराम शेटे ,आमदार नरहरी झिरवाळ यांनी प्रयत्न करून तत्कालीन पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांच्या कडून मंजुरी मिळविली.त्यासाठी ओझरखेड गावचे सरपंच गंगाधर निखाडे यांनी पाठपुरावा केला.पहिल्या टप्यातील मिळालेल्या 3 कोटी 88 लाखात 15 हेक्टर जागेत वाल कंपाउंड , रेस्टॉरंट बिल्डिंग, क्लब हाऊस, अडमिंन बिल्डिंग, पाण्याची टाकी अंतर्गत रस्ते, लॉन्स, व महत्वाचे बोटिंग यापैकी 80 टक्के काम पूर्ण झाले असून 20 टक्के काम निधीअभावी थांबले आहे.पर्यटनाचे सर्वात महत्वाचे आकर्षण बोटिंग असणार असून हे काम वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे.पहिल्या टप्यातील कामे निधीअभावी अपूर्ण असल्याने दुसरा टप्याचा निधी कधी मंजूर होणार आणि कधी मिळणार आहे.त्यामध्ये दुसर्‍या टप्यात लझरी सूट, पार्किंगव्यवस्था, हायमास्ट, बेटाचा विकास, स्थानिक व्यवसायिकांना गाळे, आदी बाबी पूर्ण केल्या जाणार असून याबाबत ओझरखेड गावचे सरपंच गंगाधर निखाडे यांनी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेऊन उर्वरित निधी मिळावा अशी मागणी केली आहे.त्याबाबत लवकरात लवकर निधी देण्याचे आश्‍वासन रावल यांनी दिले होते.त्याचप्रमाणे पर्यटन स्थळाला क दर्जा देऊन ओझरखेड गावाचाही विकास करण्यात यावा अशी मागणीही निखाडे यांनी केली असून त्याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठविला आहे.
बाहेर जाणारे पर्यटक या नवीन ठिकाणी मोठया प्रमाणात थांबतील यासाठी उर्वरित निधी मिळविण्यासाठी आ नरहरी झिरवाळ यांनी शासन स्तरावर प्रयत्न करत असून लवकरात लवकर निधी मिळवून काम पूर्ण करण्यासाठी शासनाने निधी द्यावा अशी मागणी सरपंच गंगाधर निखाडे व ग्रामस्थांनी केली आहे.