ठेकेदार व मुख्य कार्यकारी अभियंता यांच्या गोंधळामुळे मंजुर असलेले काम रखडले
अहमदनगर (प्रतिनिधी)- पाथर्डी तालुक्यातील दुलेचांदगाव येथे मंजूर असलेल्या बंधार्याचे काम ठेकेदार व मुख्य कार्यकारी अभियंता यांच्या गोंधळामुळे अर्धवट स्थितीत रखडले आहे. यामुळे बंधार्याचा मंजुर असलेला निधी परत गेला असता संतप्त ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेसमोर बंधार्याचे काम पुर्ण होण्यासाठी आमरण उपोषण सुरु केले.
या उपोषणात मारुती बांगर, सुधीर बांगर, गोपीनाथ बांगर, कैलास ढोले, प्रदीपकुमार ढोले, जालिंदर संपते, सर्जेराव गर्जे, कारभारी वाघ, विक्रम बांगर, जालिंदर बांगर, राजेंद्र सापते, सर्जेराव गर्जे, कुमार बांगर, गोरक्ष बांगर, उत्तम बांगर, सचिन बांगर, शिवाजी बांगर, अंबादास आव्हाड, महेश राख, अंबादास राख, संपत गर्जे, विष्णू थोरात, तुकाराम बांगर, भुजंग साठे आदींसह ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.
पाथर्डी तालुक्यातील दुलेचांदगाव येथे बांगर वाघ यांच्या शेत वस्तीजवळील नदीत जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाने एक बंधारा फेब्रुवारी महिन्यात मंजूर केला होता. या बंधार्याच्या कामासाठी बचत विभागाकडून निधी उपलब्ध झाला. या कामासाठी निविदा मागविण्यात येवून, सकुंडे, दराडे आदि ठेकेदारांनी निविदा पाठविल्या. यामध्ये सकुंडे यांची निविदा मंजुर करण्यात आली. सकुंडे यांच्या कागदपत्राबद्दल दराडे यांनी आक्षेप घेतल्याने हे काम काही दिवस प्रलंबीत राहिले. नंतर दराडे यांनी तक्रार मागे घेवून, बांधकाम विभागाने सकुंडे यांना काम करण्याचे आदेश दिले. वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर सुकुंडे यांनी बंधार्याची खोदाई केली, मात्र पुढील काम केले नाही. ग्रामस्थांनी पुढील काम करण्याचे सांगितले असता सुकुंडे यांनी लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मोरे हे आपणास काम करू देत नसल्याचे तोंडी सांगितले. यानंतर ग्रामस्थ हा प्रश्न घेवून कार्यकारी अभियंता मोरे यांच्याशी भेटले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली व काम करण्यास असमर्थता व्यक्त केल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
बंधार्याचे काम होण्यासाठी ग्रामस्थांनी जि.प. चे मुख्यकार्यकारी अधिकारी विश्वजीत माने व अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांची भेट घेवून हा प्रश्न मांडला. यावर तोडगा काढत त्यांनी बांधकाम विभागाला नवीन प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. परंतू आठ दिवस उलटून देखील कार्यवाही होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी जिल्हा परिषद समोर उपोषण सुरु केले आहे. ठेकेदार व मुख्य कार्यकारी अभियंता मोरे यांच्या गोंधळामुळे बंधार्याचे निधी परत गेल्याने शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. बंधार्याचा पाया खोदलेला असून पावसाळ्यात काही दुर्घटना घडल्यास संबंधित अधिकार्यांना व ठेकेदारांना जबाबदार धरण्याचा ग्रामस्थांनी इशारा दिला आहे. या कामाची चौकशी करुन, ग्रामस्थांना वेठीस धरणार्यांवर कारवाई करावी व तातडीने बंधार्याचे अर्धवट काम पुर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.