जेम्स सदरलँड यांचा राजीनामा
नवी दिल्ली वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलिया मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) क्रिकेट ऑस्ट्रेलियाला नवी दिशा देण्यात मोलाचा वाटा असणारे जेम्स सदरलँड यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामादेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. मंडळाच्या प्रशासकीय निर्णयांमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती. चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणात मंडळाची प्रतिमा डागाळली गेली असल्यानेत्यांनी राजीनामा दिला असल्याचीही चर्चा रंगली आहे.
राजीनामा दिल्यानंतर मेलबर्न येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी मात्र त्यांनी चेंडू कुरतडण्याच्या प्रकारामुळे हा निर्णय घेतला असल्याची शक्यता पूर्णपणे नाकारली. तेम्हणाले की मी एका अशा मंडळात काम करत होते, जेथे अनेक गोष्टी घडत असतात. त्यातील काही सुखद असतात, तर काही गोष्टी या केप टाऊनमधील प्रकरणासारख्या वाईटहीअसतात. पण म्हणून मी राजीनामा देतोय, असे नाही. जे प्रकरण घडले, ते निश्चितच गंभीर होते. मात्र आम्ही गेल्या वर्षभरात बऱ्याच गोष्टींचा सामना करत आहोत. त्यापैकी काहीघटनांमुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देत असून नव्या ‘सीईओ’ला संधी देऊ इच्छित आहे. नवे सीईओ खेळाडूंना आणि मंडळांना भक्कम उभारी देतील आणि नवी शिखरेपादाक्रांत करण्यास मोलाचा हातभार लावतील, असे सदरलँड म्हणाले.