फ्रेंच ओपनमध्ये शारापोव्हाचा धुव्वा
वृत्तसंस्था, पॅरिस
स्पेनची माजी विजेती गार्बिन मुगूरुझाने माजी विजेत्या मारिया शारापोव्हाचा ६-२, ६-१ असा धुव्वा उडवत फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तर दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत अव्वल सीडेडसिमोना हालेपने सेटची पिछाडी भरून काढत अँजलिक कर्बरचे कडवे आव्हान ६-७ (२-७), ६-३, ६-२ असे मोडून काढले.
मुगुरुझाने केवळ ६७ मिनिटांमध्ये ३१ वर्षीय शारापोव्हाचे आव्हान संपुष्टात आणले. शारापोव्हाने या स्पर्धेत २०१२ व २०१४ मध्ये अजिंक्यपद मिळवले होते. मुगुरुझाने २०१६ मध्ये येथे विजेतेपद जिंकले होते. शारापोव्हापेक्षा सात वर्षांनी तरुण असण्याचा लाभ मुगुरुझाला मिळाला. तिने केलेल्या आक्रमक फोरहँड फटक्यांपुढे शारापोव्हाचा बचावात्मक खेळ मर्यादित ठरला. तसेच शारापोव्हाला सव्र्हिसवरही नियंत्रण ठेवता आलेनाही. मुगुरुझाने बिनतोड सव्र्हिसबरोबरच व्हॉलीजचाही कल्पकतेने उपयोग केला.
अग्रमानांकित सिमोना हॅलेपला मात्र अँजेलिक कर्बरविरुद्ध ६-७ (२-७), ६-३, ६-२ असा विजय मिळविताना संघर्ष करावा लागला. हॅलेपने कर्बरविरुद्ध सुरुवातीला खूप खराब खेळ केला. पहिल्या सेटमध्ये दोन वेळा सव्र्हिसगमावल्यामुळे ०-४ अशी ती पिछाडीवर होती. त्यानंतर तिने सव्र्हिसवर नियंत्रण ठेवले. हा सेट टायब्रेकपर्यंत गेला. कर्बरने परतीच्या फटक्यांचा बहारदार खेळ केला. तसेच तिने नेटजवळून प्लेसिंग करीत टायब्रेकर घेतपहिला सेट मिळवला. दुसऱ्या सेटपासून हॅलेपला सूर गवसला. तिने दोन वेळा सव्र्हिसब्रेक करताना परतीचे अप्रतिम फटके मारले. हा सेट घेतल्यानंतर तिचा आत्मविश्वास वाढला. तिसऱ्या सेटमध्ये तिच्या चतुरस्र खेळापुढेकर्बरला फारशी संधी मिळाली नाही.
उत्तेजकांत दोषी आढळल्याने शारापोव्हाला २०१५पासून या स्पर्धेत भाग घेता आला नव्हता. गेल्यावर्षी तिला वाईल्डकार्डद्वारे थेट प्रवेशही देऊ केला होता; पण शारापोव्हाने तो नाकारला. मुगूरुझाविरुद्ध तिनेटाळतायेण्याजोग्या २७ चुका केल्या. संपूर्ण लढतीत तीनच गेम जिंकणाऱ्या शारापोव्हाला दुसऱ्या सेटमध्ये आपल्या सर्व्हिसवर फक्त पाच गुण पटकावता आले. आणि तिचा परभाव झाला.