प्रचलित शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी दुर करण्यासाठी गृहशाळा हा उत्तम पर्याय-- चेतन एरंडे
अहमदनगरः प्रत्येक व्यक्तीत कुतूहल, नाविन्याची ओढ व प्रत्येक गोष्ट स्वतः करुन बघण्याची इच्छा असते.अर्थातच प्रत्येकालाच शिकण्याची इच्छा उपजतच असते. शिकण्याची हीच उपजत इच्छा अधिक विकसीत व प्रगल्भ व्हावी यासाठी पालकांनी करावयाच्या पोषक व्यवस्थेला होम स्कुलींग अर्थात गृहशाळा असे म्हंटले जाते. ही व्यवस्था सध्याच्या शिक्षण व्यवस्थेतील त्रृटी दुर करण्याच्य दृष्ट्रीने आवश्यक आहे असे प्रतिपादन चेतन एरंडे यांनी केले.
ग्राहक संघातर्फे ‘ शाळेला पर्यायः गृहशाळा ’ या विशेष व्याख्यानाचे आयोजन येथील माऊली सभागृहात नुकतेच करण्यात आले होते त्यावेळी श्री. एरंडे बोलत होते. पुण्यामध्ये गृहशाळेचा प्रयोग माहिती तंत्रज्ञान अभियंते चेतन एरंडे व सौ. प्रिती एरंडे हे दाम्पत्य आपल्या पाल्यांच्या मदतीने यशस्वीरित्या राबवित आहेत, गृहशाळा ही तुलनेने नवी संकल्पना नगरकरांना समजुन सांगण्यासाठी ग्राहक संघ,अहमदनगर यांनी ‘ शाळेला पर्यायः गृहशाळा ’ या विशेष व्याख्यानाचे आयोजन केले होते. एरंडे दाम्पत्याने स्लाईड शोच्या मदतीने उपस्थितांशी संवाद साधला व गृहशाळा म्हणजे नेमके काय हे सविस्तर समजाऊन सांगितले. याप्रसंगी ग्राहक संघाचे अध्यक्ष शिरीष बापट ,सचिव राजु विद्ये कार्यकारीणी सदस्या सौ. मीरा महाजनी आदी मान्यवर उपस्थित होते.
एरंडे यांनी गृहशाळेच्या आपल्या प्रवासाबाबत तसेच चिरंजीव स्नेह याला या पध्दतीने शिकवतांना आलेल्या अडचणी व त्यातुन काढलेले मार्ग यांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. ते म्हणाले, मुलाचा जन्म म्हणजे काय? आपण पालक होणार म्हणजे नक्की काय होणार ? असे प्रश्न आम्हाला त्यावेळी पडले. पालक या नात्याने आम्हाला कोणतेही शॉर्ट कट मारायचे नाहीत यावर आम्हा दोघांचे ठाम एकमत होते. उलट आम्ही सजग, जागृत पालक होण्यासाठीच्या जबाबदार्या व कर्तव्यांचा शोध घेत होतो. गृहशाळेच्या निमित्ताने मुलांच्या सर्वांगिण जडण-घडणीच्या नव्या मार्गाचा शोध त्यातुन लागला. हा मार्ग प्रचलित मार्गाच्या दृष्ट्रीने वाजवी खर्चाचा मात्र आव्हानात्मक व जबाबदार्या काटेकोरपणे पाळायला लावणारा होता. आम्ही दोघांनी तो मोठ्या उत्साहाने व जिद्दीने स्विकारला.
एरंडे यांनी मुलांच्या बालपणीच्या वर्तनाकडे लक्ष वेधले. बालपणी मुलांचे बोबडे बोल, अडखळत चालणे, धरपडणे अशा अनंत बाबीं व्यावहारीक दृष्ट्र्या चुकीच्या असतात मात्र आम्हाला त्या कृतीचे प्रचंड कौतुक असते. पण तेच मुल जसे वाढते तसे आमचा त्याकडे पाहण्याचा दृष्ट्रीकोन बदलतो. कौतुकाची , गोंजारण्याची, समजावुन सांगुन सावरण्याची जागा शिस्त, नियम, प्रतिष्ठा घेते व शिक्षण व अभ्यास हे आपले हाडवैरी आहेत अशी भावना अप्रत्यक्षपणे मुलांमध्ये रुजु लागते. शाळा कोंडवाडा व अभ्यास म्हणजे निरस, कंटाळवाणे, मनाची घुसमट करणारे काम अशी भावना निर्माण होते.
गृहशाळेचा पर्याय निवडतांना आम्हाला या पारंपारिक दृष्टीकोनात अमुलाग्र करावा लागला. शिकण्याची ही नैसर्गिक प्रक्रिया आम्ही समजाऊन घेतली, त्यासाठी लागणारा वेळ, समाजाचे दडपण, निर्माण होणारी आव्हाने यांना सामोरे जाण्याची पूर्ण तयारी आम्ही केली होती. कारण स्नेहला 4 वर्षे विविध शाळांमध्ये घातला पण दरवेळी त्याची शिकण्याची उर्मी व शाळांच्या शिकवण्याच्या पध्दतीत असलेल्या विसंगतीमुळे त्याची घुसमट होतेय हे आम्ही अनुभवले व त्यानंतर या पध्दतीचा पुर्ण अभ्यास करुन हा निर्णय घेतला. लेखक व विचारवंत अरेना मॉन्टेसरी, मॅक्सिन बर्सन, रिक हॉल, केन रॉबिन्सन, खलील जिब्रान याची मुलांविषयीच्या साहित्याचा आधार आम्ही घेतला.
विषय समजावण्यासाठी दिवंगत राष्ट्रपती व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचे विचार, स्वामी विवेकानंदानी तसेच माजी पंतप्रधान व अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांनी शिक्षण व शिकवण्याबाबत मांडलेली मते यांचा आधार त्यांनी आपला मुद्दा अधिक स्पष्ट करतांना घेतला.
या प्रसंगी ग्राहक संघाच्या आजवरच्या कामकाजात तन-मन-धनाने योगदान देणार्या प्रकाश वखारे, विष्णू आडेप, सुधाकर नगरकर, चंद्रशेखर (उर्फ) बापू जोशी, राघु शिंदे यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रारंभी ग्राहक संघाचे अध्यक्ष शिरीष बापट यांनी प्रास्ताविक केले, त्यांनी ग्राहक संघाच्या स्थापनेपासुन दिलेला लढा, ग्राहक हितासाठी राबविलेले विविध उपक्रम, विविध पातळ्यांवर करावा लागलेला संघर्ष यांची विस्ताराने माहिती दिली. दिवंगत कार्यकर्त्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करुन श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अहमदनगर शहर सहकारी बँक व संपादक दै. समाचार यांसह सदस्य व पदाधिकार्यांनी प्रायोजकत्व स्विकारले होते त्याबद्दल बापट यांनी विशेष कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रिया बापट यांनी केले. श्रोत्यांच्यावतीने पत्रकार अभय जोशी यांनी चेतन एरंडे व सौ. प्रिती एरंडे हे दाम्पत्याशी संवाद साधला आभार सचिव राजु विद्ये यांनी मानले.
पालक किंवा समविचारी पालकांनी एकत्र येऊन सामुहिक पालकत्वाच्या आधारे अहमदनगरमध्ये गृहशाळेचा उपक्रम राबवायचा आहे. यासाठी इच्छुकांनी शिरीष बापट ( मोबा क्रं.9730565983 ) यांच्याशी संपर्क साधावा.