Breaking News

टाक्यांमध्ये पाणी भरले नाही, तडे जाण्याची भीती


सोलापूर, दि. 14, मे - शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने 17 सप्टेंबर 2007 साली यूआयडीए4सएसएमटी योजना अंतर्गत कामासाठी 71.99 कोटींची योजना मंजूर केली. त्यात शहरातील 17 पाण्याच्या टाक्यांचा समावेश होता. त्यापैकी आज 11 टाकीत पाणी भरत असून, अन्य सहापैकी सोरेगाव पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण नाही तर कर्णिकनगरसह पाच टाक्या बांधून तयार आहेत. पण त्यात पाणी भरले जात नाही. त्यामुळे त्या टाक्यांना तडे जाण्याची भीती आहे. पाण्यास दाब नसल्याने टाक्या भरल्या जात नाही, असे महापालिकेकडून सांगण्यात आले. दहा वर्षांपूर्वी मंजूर झालेली योजना शहरात कार्यान्वित नाही, यात महापालिकेचे अपयश असल्याची टीका माजी नगरसेवकांनी केली. 

पाण्याच्या टाक्या बांधून तयार आहेत. पण पाणी नाही. त्यामुळे वितरण व्यवस्थेत त्रुटी आहेत. टाक्या भरण्यासाठी पाण्यास दाब नसल्याचे कारण महापालिकेकडून सांगण्यात आले. टाक्या भरत नसल्याने त्यास तडे जाण्याची भीती आहे. विशेष म्हणजे कर्णिकनगर टाकीतून ग्रॅव्हेटीने पाणीपुरवठा होऊ शकतो, असे पुंजाल यांनी सांगितले. 
17 पैकी 11 टाक्या बांधले : यूआयडीएसएसएमटी योजनेतून 17 पैकी 11 टाक्या बांधले. सोरेगाव येथील टाकीचे काम अद्याप पूर्ण नाही. यापैकी 11 टाकीत पाणी भरले जाते तर कर्णिक नगर, एमआयडीसी, पोलिस आयुक्त कार्यालयासमोर, एमआयडीसी, जुळे सोलापुरातील पाणी टाकीत अद्याप पाणी भरले जात नाही.