Breaking News

केंद्र सरकारच्या धोरणाचा घेतला फायदा, मुंबईतील उद्योग समुहाकडून पाकची साखर आयात

दिल्ली - पाकिस्तानची आयात केलेली 30 हजार क्विंटल साखर मुंबईत दाखल झाली आहे. केंद्र सरकारच्या एका धोरणाचा फायदा उठवित मुंबईतील एका बड्या उद्योग समुहाने या साखरेची आयात केली आहे. ठराविक वस्तूंची निर्यात केल्यानंतर त्या बदल्यात काही प्रमाणात कोणतीही वस्तू विनाशुल्क आयात करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाचा फायदा उठवित मुंबईतील एका बड्या उद्योग समुहाने 30 हजार क्विंटल साखरेची आयात केली आहे. ठराविक वस्तूंची निर्यात केल्यानंतर त्या बदल्यात काही प्रमाणात कोणतीही वस्तू विनाशुल्क आयात करता येते, असे केंद्र सरकारचे धोरण आहे. याचाच फायदा घेत या उद्योग समुहाने ही साखर आयात केली आहे. पाकिस्तानच्या साखरेचे दर स्थानिक साखरेपेक्षा 1 रुपयांनी कमी आहेत. कंपनीने पाकिस्तानला चॉकलेट निर्यात केले. त्या बदल्यात चॉकलेटमधील साखरेएवढीच 30 हजार क्विंटल साखर विनाशुल्क आयात केली आहे. पनवेल आणि वाशी येथील गोदामामध्ये ती ठेवण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.