Breaking News

शिवनीती, शंभूनीतीनेे स्त्री अत्याचार थांबतील - शर्मिष्ठा घारगे


सोलापूर, दि. 14, मे - छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शंभूराजे यांच्या शासन काळात सर्व जातीधर्मातील महिलांचे जीवन सुरक्षित व भयमुक्त होते. जर कोणीही गैरकृत्य केल्यास कठोर कारवाई केली जायची. अशा शासनाची गरज आजच्या आधुनिक काळात आहे. समाजातील प्रत्येकाने शिवनीती व शंभूनीती आचरणात आणल्यास महिलांवरील अत्याचार थांबतील, असे मत सहायक पोलिस आयुक्त शर्मिष्ठा घारगे यांनी व्यक्त केले.
 
शंभूराजे युवा संघटन प्रणीत शंभूराजे छावा जन्मोत्सव मंडळातर्फे 361 व्या जन्मोत्सवानिमित्त मूर्ती प्रतिष्ठापना चार पुतळा हुतात्मा चौकात करण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या.