गडकरींच्या शेतात बॉयलरचा स्फोट
नागपूर : केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या शेतातील सौंदर्य प्रसाधने तयार करण्याच्या प्रकल्पात असलेले बॉयलरचा स्फोट झाल्याने एका मजुराचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली असून यात प्रदीप महादेव श्रीराव या कामगाराचा मृत्यू झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील नितीन गडकरी यांचं मुळ गाव असलेल्या धापेवाडा येथे शेती आहे याच ठिकाणी हळद उकडण्यासाठी एक बॉयलर लावण्यात आलं होतं, या बॉयलरचा स्फोट झाल्यानं हा अपघात घडला आहे. सुदैवाने यात मोठी जीवित हानी झाली नाही.
